आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धोनीच्या ध्वनिफितीसाठी बीसीसीआयची न्यायालयाला विनंती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - आयपीएलमधील बेटिंगबाबत भ्रष्टाचाराची चौकशी करणार्‍यामुदगल समितीपुढे भारतीय क्रिकेट संघाचा कप्तान महेंद्रसिंग धोनी याने दिलेल्या साक्षीची ध्वनिफीत अभ्यासण्यासाठी परवानगी द्यावी, यासाठी बीसीसीआयने आज सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल केला. न्यायालयाने या अर्जावर सुनावणीसाठी 11 तारीख दिली आहे. बीसीसीआयचे अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांचे जावई अय्यपन यांच्या चेन्नई सुपरकिंग्जमधील भूमिकेबाबत धोनीने दिशाभूल करणारी माहिती दिली, असा आरोप बिहार क्रिकेट असोसिएशनच्या प्रतिनिधींनी व त्यांच्या वकिलांनी केला होता. यावर न्यायालयात सुनावणी सुरू आहे.