आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

देशाला फिट ठेवण्‍यासाठी धोनी सुरू करणार 200 जिम

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुडगाव- देशातील लोकांना फिट ठेवण्‍यासाठी टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने बाह्या सरसावल्‍या आहेत. यासाठी संपूर्ण भारतभरात एक-दोन नाही तर चक्‍क 200 जिमची साखळी तो सुरू करणार आहे. गुरूवारी यासाठी त्‍याने आपले पहिले पाऊल गुडगावमध्‍ये ठेवले. गुडगावमध्‍ये त्‍याने आपल्‍या पहिल्‍या जिमची सुरूवात केली आहे.
संपूर्ण देशाला फिट ठेवण्‍यासाठी कंबर कसलेल्‍या धोनीला स्‍वत:ला जिममध्‍ये जाण्‍यास आवडत नाही. जिममध्‍ये व्‍यायाम करण्‍यापेक्षा मैदानावर घाम गाळणे त्‍याला आवडते. धोनी म्‍हणतो,'मला जिममध्‍ये जाण्‍यास आवडत नाही. त्‍यापेक्षा पळणे, उडया मारणे आणि सर्किट ट्रेनिंग करणे आवडते. नैसर्गिक पद्धतीने फिटनेस राखणे हाच चांगला मार्ग आहे. मी माझ्या करीअरची सुरूवात फुटबॉलर म्‍हणून केली होती. यामुळेच माझे पाय मजबूत आहेत, आणि त्‍यामुळेच मी जास्‍त जखमी होत नाही.' भारतीयांची फिटनेसबाबत असलेली अनास्‍था दूर करायची धोनीची इच्‍छा आहे.