आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई - क्रिकेटमधील आतापर्यंतच्या सर्वाधिक यशस्वी ब्रँड धोनीच्या लोकप्रियतेला उतरती कळा लागली आहे, तर विराट कोहलीची लोकप्रियता अनपेक्षितपणे वाढत आहे. दोन वर्षांतील परदेशातील पराभवाच्या मालिकेमुळे टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीची ‘ब्रँड व्हॅल्यू’ कमालीची घसरली आहे.
बांगलादेशातील आशिया कप स्पर्धेतील माघारीनंतर धोनीचा जाहिरातदारांच्या मार्केटमधील शेअर खाली घसरला. त्याच वेळी कोहलीने कप्तानपदाच्या पहिल्याच सामन्यात शतक झळकावून ‘ब्रँड व्हॅल्यू’ कमालीची वर नेली. गतवर्षीच ‘ब्रँड’मध्ये सामील झालेल्या कोहलीची झेप ‘ब्रँड ट्रस्ट रिसर्चर’च्या 2014 वार्षिक अहवालात कौतुकाची मानली जात आहे. सचिन तेंडुलकर, धोनी, सौरव गांगुली आदी मान्यवर स्पोर्ट्स ब्रँडमध्ये गतवर्षी प्रवेश करूनही कोहलीने पाचवे स्थान पटकावले आहे.
तज्ज्ञांच्या मते, कोहली लवकरच धोनीची जागा घेईल. तेंडुलकरच्या काही जाहिराती जशा धोनीकडे गेल्या तशा धोनीच्या कोहलीला मिळण्याची शक्यताही व्यक्त होत आहे.
धोनीला धोका : तीन वर्षांपासून धोनी यंदा दुसºया स्थानावर आहे, असे ट्रस्ट रिसर्च अॅडव्हायझरीचे सीईओ एन. चंद्रमौली यांनी सांगितले.
कोहलीला आव्हान नाही : आव्हान नसल्याने यापुढे कोहलीच आकर्षण असेल, असे ब्रँड ट्रस्ट रिसर्चचे प्रमुख सचिन भोसले यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.