आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमित मिश्रा कर्णधार धोनीचा नावडता खेळाडू!, डावपेचामुळे मिश्राला संधीच नाही

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चंदिगड - भारतीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी आता सक्षम झाला आहे. प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणत्या खेळाडूंना खेळवायचे आणि कोणाला बाहेर बसवायचे यात धोनीचीच मर्जी चालते. याचाच प्रत्यय सध्या न्यूझीलंड दौर्‍यात दिसून येत आहे. या दौर्‍यात धोनीने लेग स्पिनर अमित मिश्राला एकाही सामन्यात खेळण्याची संधी दिली नाही आणि निवड समितीचे रॉजर बिन्नी यांचा मुलगा स्टुअर्टला केवळ एकच षटक टाकण्याची संधी दिली. एवढेच नाही तर त्याने मध्य प्रदेशचा वेगवान गोलंदाज ईश्वर पांडेवरही विश्वास ठेवला नाही. मात्र, पांडेने सराव सामन्यात तीन विकेट घेऊन सर्वांचे लक्ष वेधले.
मिश्रा चॅम्पियन्स ट्रॉफीसह न्यूझीलंड दौर्‍यापर्यंत टीम इंडियाचा सदस्य राहिला आहे. मात्र, यादरम्यान त्याला केवळ ऑस्ट्रेलियाविरुद्ध घरच्या मैदानावर एकच वनडे खेळण्यात आला. त्यानंतर धोनीने त्याला कोणत्याही सामन्यात उतरवले नाही. मिश्राने आपला शेवटचा वनडे सामना 30 ऑक्टोबर 2013 रोजी नागपूर येथे खेळला होता. तेव्हापासून भारताने वेस्ट इंडीज, दक्षिण आफ्रिका व न्यूझीलंडविरुद्ध वन डे मालिका खेळली. मात्र, धोनीने मिश्राला इलेव्हनमध्ये खेळण्याची कधीही संधी दिली नाही.
विराट कोहलीने दिली होती संधी
मागील वर्षी विराट कोहलीने मिश्राला झिम्बाब्वे दौर्‍यात टीम इंडियाकडून खेळण्याची संधी दिली होती. त्यामुळे मिश्रा या दौर्‍यात मालिकेतील पाचही वनडे खेळला होता. यादरम्यान धोनी गैरहजर होता. या संधीचे चीज करताना मिश्राने मालिकेत 18 विकेट घेतल्या होत्या. 2003 मध्ये पदार्पण करणार्‍या मिश्राने 11 वर्षांच्या क्रिकेट करिअरमध्ये आतापर्यंत 21 वनडेत 37 विकेट घेतल्या आहेत.
धोनीचा निवड समितीला संकेत
मिश्राला यादरम्यान दोन्हीकडच्या जाचाला सामोरे जावे लागत आहे. निवड समितीकडून मिश्राला संघात स्थान दिले जाते. मात्र, धोनी त्याला मैदानावर खेळू देत नाही. यावरूनच धोनीने निवड समितीला आपल्याच र्मजीचे खेळाडू मैदानावर उतरवणार असल्याचे संकेत दिले आहेत. आता न्यूझीलंड दौर्‍यातील ताजे उदाहरण आहे, धोनीने एकाच षटकानंतर बिन्नीला संधीच दिली नाही.