आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धोनी झाला चेन्नई संघाचा सह-मालक, म्‍हणाला - Let's Football!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(चेन्नई टीमच्‍या लॉन्चिंगवेळी महेंद्र सिंह धोनी)
मुंबई - भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्र सिंह धोनी आता फुटबॉलच्‍या मैदानात उतरला आहे. फुटबॉल क्लबचा सहमालक म्‍हणून त्‍याने फुटबॉलच्‍या मैदानात पाय रोवायला सुरुवात केली आहे. 12 ऑक्‍टोबर पासून सुरु होणा-या 'इंडियन सुपर लीग' या फुटबॉल स्‍पर्धेतील चेन्नईयिन फुटबॉल क्लबचा तो सहमालक आहे.

चेन्नईयिन फुटबॉल क्लबची मालकिन वीता दानी यांनी प्रेस कॉन्‍फरन्‍स मध्‍ये सांगितले की, "धोनीसारखा फुटबॉल प्रेमी आमच्‍या क्‍लबमध्‍ये सहभागी झाल्‍याचा आम्‍हाला गर्व आहे. धोनी चेन्नईच्‍या क्रीडाप्रेंमींसोबत जोडला गेला आहे. त्‍यामाध्‍यमातून चेन्नईमध्‍ये एक वर्ल्ड क्लास फुटबॉल क्लबची आशा ठेवू शकतो.’’
‘’मी शाळेमध्‍ये असताना गोलकीपर होतो. मला फुटबॉलचे सामने पाहताना मला अतिशय आनंद होत असतो. या खेळासोबत पुन्‍हा एकदा नव्‍याने जोडल्‍याने मला आनंद होत आहे. या फुटबॉल क्बबमुळे माझे स्‍वप्‍न पूर्ण होत आहे.

धोनीच्‍या संघाचा पहिला सामना 15 ऑक्‍टोबर रोजी गोला फुटबॉल क्लब विरुद्ध खेळला जाणार आहे. त्‍यांच्‍या होम ग्राउंडवर त्‍यांचा सामना 21 ऑक्‍टोबर रोजी केरळ ब्‍लास्‍टर्स सोबत असणार आहे.
पुढील स्‍लाइडवर पाहा, ISL मध्‍ये सहभागी होणा-या संघाची नावे आणि त्यांच्‍या मालकांची छायाचित्रे..