Home »Sports »From The Field» Dhoni Out In India After 2 Year, Also Completed 200 Catch

वन डे क्रिकेटमध्ये दोन वर्षांनंतर पहिल्यांदाच बाद झाला कर्णधार धोनी!

दिव्य मराठी वेब टीम | Jan 07, 2013, 11:18 AM IST

  • वन डे क्रिकेटमध्ये दोन वर्षांनंतर पहिल्यांदाच बाद झाला कर्णधार धोनी!
हे ऐकून थोडे आश्चर्य वाटेल. मात्र, हे सत्य आहे. गेल्या दोन वर्षांमध्ये कर्णधार धोनीने वन डेत पहिल्यांदा मायभूमीत आपली विकेट गमावली. योगायोगाने धोनी शेवटच्या वेळी मोहाली येथे पाकविरुद्ध विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यात बाद झाला होता. त्यानंतर तो सलग आठ डावात नाबाद राहिला. त्याने नऊ डावात 506 धावा काढल्या. या दरम्यान, त्याने एक शतक आणि चार अर्धशतके झळकावली आहेत.
धोनीचे 200 झेल पूर्ण- कर्णधार व यष्टीरक्षक महेंद्रसिंग धोनीने पाकिस्तानविरुद्धच्या तिस-या एकदिवसीय सामन्यात सईद अजमलचा झेल घेत वनडे क्रिकेटमध्ये आपले 200 झेल पूर्ण केले. धोनीने वेगवाग गोलंदाज सामी अहमद यांच्या गोलंदाजीवर सईद अजमलचा 200 झेल पकडला. अशी कामगिरी करणारा धोनी हा सहावा यष्टीरक्षक बनला आहे. धोनीने फलंदाजीत दमदार कामगिरी करताना विकेटच्या मागेही कमाल केली आहे. त्याने 214 सामन्यात एकूण 268 बळी टिपले आहेत. त्यात 200 झेल व 68 यष्टीचित पकडले आहेत. यष्टीरक्षणात सर्वोत्तम यष्टीरक्षकात धोनी आता सहाव्या नंबरवर आहे.

Next Article

Recommended