मुंबई -
टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीचे श्रीलंकेविरुद्ध वनडे मालिकेतील शेवटच्या सामन्यात खेळणे अद्याप अनिश्चित आहे. तो या दोन वनडेतूनदेखील बाहेर बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भारताने सलग दुस-या वनडेत विजय मिळवून मालिकेत २-० ने आघाडी घेतली आहे. आता तिसरा सामना रविवारी होईल.
निवड समितीने मालिकेतील सुरुवातीच्या तीन वनडेसाठी संघ जाहीर करताना धोनीला विश्रांती देण्याचा निर्णय घेतला. या वेळी संघाचे नेतृत्व कोहलीकडे सोपवण्यात आले. मात्र, या वेळी धोनी शेवटच्या दोन वनडेतही खेळणार की नाही याबाबत काहीही स्पष्ट केले नव्हते. मात्र, हाताच्या गंभीर दुखापतीमुळे
आपण खेळणार नसल्याचे धोनीने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला सांगितले. या दुखापतीतून सावरण्यासाठी मला वेळ लागेल, असेही त्याने स्पष्ट केले.
जाहिरातीचे चित्रीकरण जोमात : सध्या धोनी दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये जाहिरातीच्या चित्रीकरणामध्ये व्यग्र आहे. यासाठी खेळपट्टीवर मोठा टेंट लावून स्टेडियममधील प्रवेशास मनाई केली गेली.