आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: धोनी बनला तिरंदाज, फुटबॉल मॅचमध्‍येही हरवले विरोधी संघाला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रांची- टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने शुक्रवारी तिरंदाजीमध्‍ये आपले हात आजमावून पाहिले. शिवाय त्‍याचे पहिले प्रेम असलेल्‍या फुटबॉल सामन्‍यातही आपली चमक दाखवली. झारखंडचे माजी उपमुख्‍यमंत्री आणि त्‍याचे मित्र सुदेश महतो, चेन्‍नई टीमचे फिजिओ टॉमबरोबर तो रांचीपासून 50 किलोमीटर अंतरावर असलेल्‍या सिल्‍ली येथील बिरसा मुडा तिरंदाजी प्रशिक्षण केंद्रात गेला होता. त्‍यावेळी त‍ेथील खेळाडू तिरंदाजीचा सराव करीत होते. धोनीने तेथील एका खेळाडूचा धनुष्‍य घेऊन निशाना साधण्‍याचा प्रयत्‍न केला.

या सराव केंद्रातून अनेक आंतरराष्‍ट्रीय तिरंदाज तयार झाले असल्‍याचे धोनीला जेव्‍हा सांगण्‍यात आले तेव्‍हा तो खूपच खुश झाला. तिरंदाजीनंतर धोनी सिल्‍ली येथील फुटबॉलच्‍या प्रदर्शनीय सामन्‍यात खेळला. त्‍याच्‍या टीमने हा सामना 4-0ने जिंकला. सिल्‍लीच्‍या अ‍ॅस्‍ट्रोटर्फ फुटबॉल स्‍टेडिअममध्‍ये सिल्‍ली स्‍पोर्ट्स अ‍ॅकडमी अ आणि ब संघात हा सामना झाला होता. धोनीच्‍या टीममध्‍ये टॉम आणि सुदेश महतोही होते. टॉम, धोनी आणि सुदेश यांनी आपल्‍या टीमकडून प्रत्‍येकी एक-एक गोल केला.
पुढच्‍या स्‍लाईडला क्लिक करून पाहा धोनीने कशापद्धतीने साधला निशाणा आणि कसा केला गोल...
फोटो- रमीझ आणि अनुप महतो