आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धोनीचा षट्कार : \'गोरे कुठे गेले, त्यांना केवळ तिखट-मीठ लावता येते\'

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मोहाली - इंग्लंडला पराभवाची धुळ चारल्यानंतर टीम इंडियाचा कर्णधार महेंद्र सिंह धोनी ध्रुव पांडव हॉलमध्ये पोहचला तेव्हा तेथील पत्रकार परिषदेसाठी एकही इंग्रज पत्रकार नव्हता. हे चित्र पाहून धोनीने गोरे कुठे गेले. सगळेच निघून गेले का. असे विचारले. त्यानंतर ब्रिटीश पत्रकारांना उद्देशून तो म्हणाला, त्यांना केवळ तिखट-मीठ लावता येते. धोनीच्या या अनपेक्षित वक्तव्याने भारतीय पत्रकरांमध्ये खसखस पिकली.
सामना संपल्यानंतर पत्रकार परिषदेचे आयोजन केले जाते.त्यात दोन्ही देशांचे माध्यम प्रतिनिधी उपस्थित असतात.

धोनीने गांगुलीला टाकले मागे

मोहालीतील विजयासोबतच (वाचा, भारताचा मालिका विजय) धोनी एकदिवसीय सामान्यातील दुसरा यशस्वी कर्णधार बनला आहे. धोनीच्या नेतृत्वातील १३४ सामन्यांपैकी ७७ सामन्यात भारताने विजय मिळविला आहे. तर, सौरव गांगुलीने १४६ सामन्यात भारताचे नेतृत्व केले आणि ७६ सामन्यात भारताला विजय मिळवून दिला. मोहम्मद अझरुद्दीनने भारताला ९० सामन्यांमध्ये विजयश्री मिळवून दिली होती त्यामुळे तो अव्वल क्रमांकावर आहे. विशेषम्हणजे, मोहाली येथे बुधवारी गांगुली समालोचक म्हणून उपस्थित होता.