आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dhoni Raina Hit And Hit, Chennai Defeated Hyderabad By 12 Runs

चॅम्पियन्स लीग: धोनी-रैनाने धो-धो धुतले, चेन्नई सुपरकिंग्जचा हैदराबादवर 12 धावांनी विजय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रांची - सुरेश रैना (84) व महेंद्रसिंग धोनीच्या (नाबाद 63) झंझावाती फलंदाजीच्या जोरावर चेन्नई सुपरकिंग्जने गुरुवारी चॅम्पियन्स लीग टी-20 क्रिकेट स्पर्धेत सनरायझर्स हैदराबादचा 12 धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना चेन्नईने 4 बाद 202 धावा काढल्या होत्या. प्रत्युत्तरात हैदराबादने 7 गडी गमावून 190 धावा काढल्या.


प्रथम फलंदाजी करणा-या चेन्नईचा सलामीवीर मुरली विजय शून्यावर बाद झाला. त्यानंतर रैनाने हसीसोबत दुस-या विकेटसाठी 45 धावांची भागीदारी करून डाव सावरला. हसीला (23) ड्युमिनीने बाद केले. त्यानंतर रैना व बद्रीनाथने (13) तिस-या गड्यासाठी 70 धावांची भागीदारी केली. मात्र, ड्युुमिनीने बद्रीनाथला बाद केले. धोनी व रैनाने चौथ्या विकेटसाठी 60 धावांची भागीदारी केली.


संक्षिप्त धावफलक
चेन्नई सुपरकिंग्ज : 4 बाद 202, सनरायझर्स हैदराबाद : 7 बाद 190.