आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

होमपिचवर विजयासाठी धोनी सज्ज;आज होणार तिसरी वन डे मॅच

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रांची - होमपिचवर विजय मिळवण्यासाठी कर्णधार महेंद्र सिंग धोनी सज्ज झाला आहे. शनिवारी भारत व इंग्लंड तिसरा वन डे नव्या स्टेडीयमवर होणार आहे. पाच वन डे सामन्यांच्या मालिकेतील या तिस-या लढतीत भारतीय धुरंधर शानदार कामगिरीच्या जोरावर कर्णधार धोनीला विजयाची भेट देण्यास इच्छुक आहेत. दोन्ही संघाने मालिकेत 1-1 ने बरोबरी मिळवली आहे. या लढतीत विजय मिळवणारा संघ मालिकेवरचा आपला दावा मजबूत असू शकेल.

गंभीर-रहाणेवर मदार
कोची वन डेमध्ये भारताचे दोन्ही सलामीवीर अपयशी राहिले. दुसरीकडे राजकोट येथील दुस-या वन डेत दोघांनी चांगली सुरुवात केली.मात्र, त्यांना मोठा स्कोर उभा करता आला नाही. रांची वन डेत या दोघांनाही चांगली सुरुवात करून द्यावी लागेल. तिस-या क्रमांकावर फलंदाजीसाठी येत असलेला विराट सलग सहा सामन्यांपासून धावांचा 50 चा आकडा पार करू शकला नाही. युवराज सिंगलादेखील चांगली कामगिरी करावी लागेल.
भुवनेश्वर, शमीवर असणार खास नजर
टीम इंडियाचे दोन युवा गोलंदाज भुवनेश्वर कुमार व शमी अहमदने आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. रांचीमध्येही चांगली सुरुवात करून देण्याची जबाबदारी या दोघांवर असेल. इशांतचा लय कोची वन डेमध्ये नव्हता.मात्र, आपल्या गोलंदाजीत सुधारणा करण्यावर त्याचा भर असेल. आर.अश्विन, रवींद्र जडेजा, युवराज सिंग हे त्रिकुटांवरही संघाच्या विजयाची जबाबदारी असणार आहे. इंग्लंडची गोलंदाजीचा मागील दोन सामन्यांपासून फारसा प्रभाव टाकू शकली नाही.
दुखापतीनंतरही धोनी खेळणार
शुक्रवारी नेट सरावादरम्यान धोनीच्या हाताला जखम झाली. मात्र, ही दुखापत गंभीर नसल्याचे लक्षात आल्यावर संघाच्या व्यवस्थापकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. या दुखापतीनंतरही तो तिस-या वनडेत खेळणार आहे. नेटवर सराव करत असताना चेंडू धोनीच्या उजव्या हाताच्या अंगठ्यावर लागला. त्यानंतर टीम व्यवस्थापकांनी धोनी पूर्णपणे फिट असल्याचे स्पष्ट केले.
पराभवातून सावरणार इंग्लंड टीम
दुसरीकडे इंग्लंड टीमचे फलंदाज कोची वनडेतील पराभवातून सावरण्याचा प्रयत्न करतील. इंग्लंडच्या खेळाडूंनी गुरुवारी सराव केला नाही. मात्र, शुक्रवारी पाहुण्या संघाने जोरदार सराव केला.
नव्या स्टेडियमचे जल्लोषात उद्घाटन
रांची येथे नव्याने बांधण्यात आलेल्या स्टेडियमचे शुक्रवारी जल्लोषात उद्घाटन करण्यात आले. या उद्घाटन सोहळ्यात कर्णधार धोनीने स्वत: ढोल वाजवला. या वेळी सगळीकडे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. या कार्यक्रमास भारतीय नियामक मंडळाचे अध्यक्ष एन.श्रीनिवास, झारखंडचे राज्यपाल सय्यद अहमद, माजी मुख्यमंत्री अर्जुन मुंडा यांच्यासह अनेक सदस्य उपस्थित होते. या वेळी जेएससीएच्या वतीने भारतीय संघाच्या खेळाडूंचे स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमात कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. या वेळी अभिनेता कबीर बेदीची खास उपस्थिती होती. तिस-या वनडेच्या पूर्वसंध्येला स्टेडियमच्या उद्घाटन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.