आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dhoni Remmebers Sachin In Sachin Cricketer Of Century Book Launch Function

PHOTOS: सचिनसमोर बोलण्‍याची हिंमत होत नाही- धोनी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- 'लहाणपणापासून सचिन तेंडुलकर माझा क्रिकेटमधील हिरो आहे. त्‍याचा खेळ पाहूनच मी मोठा झालो. त्‍याच्‍याबरोबर टीम इंडियामध्‍ये खेळायला मिळण्‍याबाबत मी नशीबवान आहे,' असे गौरवोउद्गार टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने सचिन तेंडुलकरवरील 'सचिन क्रिकेटर ऑफ सेंच्‍युरी' या पुस्‍तकाच्‍या प्रकाशन सोहळयात काढले. हे पुस्‍तक विमलकुमार यांनी लिहिले आहे.

धोनीने यावेळी दहा वर्षांपूर्वीची एक आठवण सांगितली. पुण्‍यामध्‍ये आयोजित करण्‍यात आलेल्‍या दुलीप ट्रॉफीच्‍या एका सामन्‍यात सचिन 199 धावांवर नाबाद होता. त्‍यावेळी धोनी आपल्‍या पूर्व विभागाच्‍या टीमला पाणी देण्‍यासाठी मैदानात गेला होता. पश्चिम विभागाकडून खेळणा-या सचिनने धोनीला मी पाणी पिऊ शकतो का? असे विचारले. आपल्‍या हिरोला समोर पाहून धोनी स्‍तब्‍धच झाला. त्‍याच्‍या तोंडातून काहीच शब्‍द आले नाही. त्‍याने चूपचाप पाण्‍याचा ग्‍लास समोर केला.

सचिननेच टीम इंडियाच्‍या कर्णधारपदासाठी आपले नाव सुचवले होते, हे सांगण्‍यासही तो विसरला नाही.

धोनीने यावेळी सचिनसोबतच्‍या अनेक आठवणींना उजाळा दिला. धोनी आणि सचिनच्‍या क्रिकेटमधील आठवणी जाणून घेण्‍यासाठी क्लिक करा पुढच्‍या स्‍लाईडला.