आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: 150 कोटी रूपयांत तयार झाले धोनीचे \'हे\' मैदान

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रांची- इंग्‍लंडविरूद्धची वनडे मालिका भारतातील नवीन स्‍टेडिअमचे उद्‍घाटन करण्‍याचे माध्‍यम बनले असल्‍याचे दिसून येत आहे. सर्वात पहिल्‍यांदा राजकोट येथे नव्‍याने बांधलेल्‍या स्‍टेडिअममध्‍ये टीम इंडिया आणि इंग्‍लंड एकमेकांना भिडले. आता मालिकेतील तिसरा सामना रांचीमध्‍ये खेळवण्‍यात येत आहे. आणि तोही नव्‍याने बांधलेल्‍या एचईसी स्‍टेडिअमवर.

धोनीचे होमटाऊन असलेल्‍या रांचीमध्‍ये पहिलाच आंतरराष्‍ट्रीय सामना होत आहे. आज (17 जानेवारी) रोजी झारखंड क्रिकेट असोसिएशनने या मैदानाचे अधिकृत उद्‍घाटन केले.

राजकोटमध्‍ये इंग्‍लंडकडून 9 धावांनी पराभूत झाल्‍यानंतर कोची इथे झालेल्‍या दुस-या वनडे सामन्‍यात टीम इंडियाने 127 धावांनी धमाकेदार विजय प्राप्‍त केला होता. आता होमग्राऊंडवर धोनी काय पराक्रम करतो याच्‍याचकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

पुढच्‍या स्‍लाईडला क्लिक करून जाणून घ्‍या रांचीच्‍या या नव्‍या स्‍टेडिअमचे खास नजारे...

(फोटो साभार- झारखंड राज्‍य क्रिकेट असोसिएशन)