आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

..अन् धोनी सचिनला म्हणाला, ‘आम्हाला थोडा वेळ एकांतात सोड’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - टीम इंडियातील सर्व सदस्य खेळाडू लाडक्या सचिनला सरप्राइज देण्यास इच्छुक होते. त्यांनी आपल्या योजनेनुसार तसा निरोपही दिला. याची सचिनला किंचितही माहिती नव्हती.
‘मालिकेतील शेवटच्या कसोटीत नववा बळी घेतल्यानंतर सर्व खेळाडूंनी गळाभेट घेऊन विजयाचा आनंद साजरा केला. असाच जल्लोष करण्यासाठी मी खेळाडूंकडे वळलो. दरम्यान,‘आम्हाला थोडा वेळ एकांतात सोड’ अशी विनम्र विनंती धोनीने केली,’ असे एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सचिनने सांगितले. ‘आम्ही सरप्राइजची तयारी करत आहोत. त्यामुळे तू तिकडे येऊ नकोस,’ असे धोनीने सांगितले. त्याच्या अशा बोलण्याने मी विचारात पडलो, काय तयारी सुरू आहे. खेळाडू वेगळे काहीतरी करू इच्छित असल्याचे मला वाटले, असेही तो म्हणाला.
वेस्ट इंडीजविरुद्ध मालिका 2-0 ने जिंकल्यानंतर भारतीय संघाच्या खेळाडूंनी सचिनची गळाभेट घेतली. त्यानंतर धोनी आणि टीमने सचिनला गार्ड ऑफ ऑनरने सन्मानित केले. दरम्यान, मैदान सोडून सचिन पॅव्हेलियनमध्ये परतला. त्यानंतर मैदानावर परतलेल्या सचिनला विराट कोहली आणि कर्णधार महेंद्रसिंग धोनीने खांद्यावर उचलून फिरवले. त्यानंतर क्रमाक्रमाने शिखर धवन, रोहित शर्मा, प्रज्ञान ओझासारख्या दिग्गज खेळाडूंनी मास्टर ब्लास्टरला खांद्यावर घेऊन मैदानावरून फिरवले आणि निरोप दिला.
आता आत्मकथा लिहिणार सचिन
निवृत्तीनंतर आता क्रिकेटच्या विश्वातील सुवर्ण 24 वर्षांतील अनुभवावर आत्मचरित्र लिहिण्याचा सचिन विचार करत आहे. आत्मचरित्राच्या प्रत्येक पानावर दोन तपातील सुवर्ण कामगिरीची माहिती असेल. तसेच काही व्यक्तींच्या खासगी जीवनाविषयीचा उल्लेखदेखील या आत्मचरित्रात असेल, असेही सचिनने सांगितले.
टीमसोबत घालवले महत्त्वपूर्ण क्षण
वानखेडेवरचा निरोप आयुष्यभर अविस्मरणीय राहील. टीमसोबत घालवलेल्या प्रत्येक क्षणाची आठवण ठेवीन. टीमसोबत दौरा करताना वेगळाच अनुभव येतो. तुम्ही प्रतिस्पध्र्याविषयी विचार करता. त्यांच्याविरुद्ध कसे खेळावे, यासारखा विचार तुमच्या डोक्यात सुरू असतो. सोबत जेवण करणे आणि विनोद करणे, हे सर्व चांगले अनुभव असतात,’ असेही या वेळी सचिन म्हणाला.