Home »Sports »From The Field» Dhoni Sixer King Now Ahead From Yuvraj & Ianzmam-Ul-Hak

षटकारांच्या टॉप 10 यादीतही धोनीने इंझमाम-युवराजला टाकले मागे

दिव्य मराठी वेब टीम | Jan 07, 2013, 11:46 AM IST

  • षटकारांच्या टॉप 10 यादीतही धोनीने इंझमाम-युवराजला टाकले मागे
पाकविरुद्ध तिसर्‍या वनडेत तीन षटकार ठोकल्यानंतर धोनी वनडे क्रिकेटमध्ये युवराजसिंग आणि इंझमाम-उल-हकच्या पुढे गेला. धोनीच्या नावे आता 146 षटकार झाले आहेत. वनडेत सर्वाधिक षटकार मारण्याच्या यादीत धोनी नवव्या क्रमांकावर पोहोचला आहे. इंझमाम-उल-हक व युवराज सिंग यांच्या नावावर सध्या प्रत्येकी 144 षटकारांची नोंद आहे. टॉप 10 मध्ये दहाव्या नंबरवर असलेल्या युवराजला धोनीने रविवारच्या सामन्यानंतर बाहेर काढले तर इंझमामला मागे टाकत नवव्या नंबरवर झेप घेतली.
सर्वाधिक षटकार मारणारे टॉप 10 फलंदाज
1. शाहिद आफ्रिदी : 298.
2. सनथ जयसूर्या : 270.
3. सचिन तेंडुलकर : 195.
4. ख्रिस गेल : 193.
5.सौरव गांगुली : 190.
6. रिकी पाँटिंग : 162.
7. ख्रिस केर्न्‍स : 153.
8. अँडम गिलख्रिस्ट : 149.
9. महेंद्रसिंग धोनी : 146.
10. इंझमाम-उल-हक 144.

Next Article

Recommended