आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फुटबॉलपटूच्या लूकमध्ये धोनी,टीम इंडियाच्या कर्णधाराने केली पुन्हा नवी हेअरस्टाइल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रांची - आपल्या हेअरस्टाइलमुळे नेहमीच चर्चेत असलेला भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी रविवारी पुन्हा एकदा वेगळ्या लूकमध्ये झळकला. यंदा त्याने ‘बाल्ड बज कट-मोहॉक’चा लूक केला आहे. चॅम्पियन्स लीग टी-20 क्रिकेट स्पर्धेत रविवारी टायटन्सविरुद्धच्या सामन्यात धोनीचा नवा लूक चाहत्यांच्या नजरेस पडला. डोक्याच्या दोन्ही बाजूंनी महिन ट्रिमिंग आणि मध्यात मोठे केस असा हा लूक आहे. फुटबॉलपटूंमध्ये हा लूक सर्वसाधारण आहे. मात्र, कोणत्याही भारतीय क्रिकेटपटूने प्रथमच ही हेअरस्टाइल केली आहे.