आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dhoni Takes CAB To Task For Misspelling Tendulkar\'s Name

इडन गार्डन्‍समध्‍ये कट-आऊटवर सचिनचे स्‍पेलिंग चुकल्‍यामुळे भडकला धोनी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अखेरच्‍या कसोटी क्रिकेट मालिकेवरुन होत असलेला उदो उदो खुद्द मास्‍टर ब्‍लास्‍टर सचिन तेंडुलकरला खटकत असल्‍याचे वृत्त असतानाच टीम इंडियाचा कर्णधार महेंद्र सिंह धोनीने बंगाल क्रिकेट असोसिएशनवर सचिनच्‍या नावाचे स्‍पेलिंग चुकविल्‍यावरुन नाराजी व्‍यक्त केली आहे.

बुधवारपासून कोलकाता येथील इडन गार्डन्‍स मैदानावर भारत आणि वेस्‍ट इंडिजदरम्‍यान कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. हा सामना सचिनच्‍या कारकिर्दीतील 199 वा सामना असून या मैदानावर त्‍याचा अखेरचा सामना आहे. त्‍यामुळे टीम इंडियाचे कोलकात्‍यात स्‍वागत झाले त्‍यावेळेस केवळ सचिनच्‍याच नावाचा उदो उदो करण्‍यात आला. इतर सहका-यांकडे यामुळे दुर्लक्ष झाल्‍याची भावना त्‍याच्‍या मनात आहे. त्‍यातच आज रोहित शर्मा आणि इडन गार्डन्‍सचे क्‍युरेटर चौधरी यांच्‍यात वाद झाला. त्‍यात भर म्‍हणून धोनीने पत्रकार परिषदेमध्‍ये सचिनच्‍या नावाचे स्‍पेलिंग चुकविल्‍यावरुन टीका केली. धोनीने पत्रकार परिषदेमध्‍ये सामन्‍याबाबत काहीही बोलण्‍यास सुरुवात करण्‍यापूर्वी थेट बंगाल क्रिकेट संघटनेवर टीका सुरु केली.