आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सरावाला सुट्टी घेऊन धोनी सपत्‍नीक पोहोचला वाईनयार्डमध्‍ये!

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एडिलेड- धीम्‍या गतीने षटके टाकल्‍याबद्दल चौथ्‍या कसाटीसाठी निलंबित करण्‍यात आलेला टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने आपला वेळ सत्‍कारणी लावल्‍याचे दिसत आहे. धोनीने गुरूवारी एडिलेड येथील वाईनयार्डला (मद्यासाठी वापरण्‍यात येणा-या द्राक्ष बाग) भेट दिली.

ऑस्‍ट्रेलियन माध्‍यमांमध्‍ये आलेल्‍या वृत्तानुसार धोनीने पत्‍नी साक्षीबरोबर ऍडिलेड येथील वाईनयार्डची सहल केली. ऍडिलेड येथे 50 वाईनयार्ड आहेत. परंतु, संघ व्‍यवस्‍थापक जी. एस वालिया यांनी या वृत्ताचा इन्‍कार केला आहे. बुधवारी संध्‍याकाळी धोनी ऍडिलेड येथे पोहोचला होता.

शुक्रवारी धोनी सराव करणार आहे तर संघाचे इतर सदस्‍य विश्रांती घेणार आहेत. संघातील काही सदस्‍य बरोसा व्‍हॅली पाहण्‍यास जाणार आहेत. निलंबनामुळे मिळालेल्‍या मोकळया वेळेचा दबाव कमी करण्‍यासाठी धोनीला चांगला उपयोग होऊ शकतो.
होय, मी पराभवाची जबाबदारी स्वीकारतो- धोनी
कर्णधार धोनी घेणार कसोटी क्रिकेटचा संन्‍यास?
पुढचा विश्वचषक खेळण्याची खात्री नाही : धोनी, 2013 पर्यंत निर्णय घेणार