स्पोर्ट्स डेस्क- इंग्लंड टीमने भारत ए विरूद्धचा पहिला सराव सामना ३ विकेटनी जिंकला. एक कर्णधार म्हणून धोनीची ही शेवटची मॅच होती. या मॅचमध्ये धोनी भले ही भारताला जिंकून देऊ शकला नाही पण त्याने या सामन्यात धडाकेबाज खेळी केली. धोनीने धुव्वांधार फटकेबाजी करत ३५ चेंडूत अर्धशतक ठोकले तर केवळ ४० चेंडूत नाबाद ६८ धावा केल्या. शेवटच्या षटकात तर धोनीने दोन चौकार आणि दोन षटकार ठोकत २३ धावा काढल्या. त्यावेळी पूर्वीचा धोनी रसिकांना अनुभवाला मिळाला. सोशल मीडिया झळकला धोनी...
- या मॅचमध्ये लोक खासकरून धोनीला पाहायला स्टेडियममध्ये हजर होते. त्यावेळी स्टेडियममध्ये फक्त धोनी-धोनी नावाचा जप ऐकू येत होता.
- धोनी जसा फलंदाजी करण्यास उतरला तसा तो सोशल मीडियात ट्रेंड करू लागला. त्याचे कौतूक करताना लोकांनी एकापेक्षा एक सरस वर्णन केले.
- एका यूजरने लिहले की, 'काही ही म्हणा पण धोनीसारखा एखादाच पाहायला मिळतो.'
- सुबोध नावाच्या एका यूजरने लिहले, 'ज्या दिवशी धोनी रिटायर होईल त्यादिवसापासून क्रिकेट पाहणे मी बंद करेन.'
- विश्वनाथ नावाच्या यूजरने लिहले, 'केवळ धोनीच्या कीपिंगमध्येच ही क्षमता आहे ज्यात तो क्रिकेट मॅचलाच फुटबॉल मॅचमध्ये बदलू शकतो.'
- एका यूजरने लिहले की, 'परीक्षेचा निकाल लागण्याआधीही मला असे झाले नाही पण स्टेडियममध्ये धोनी धोनीचा आवाज ऐकून माझ्या अंगावर काटे उभे राहिले. '
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, धोनीची बॅटिंग पाहून फॅन्सने काय काय केल्या कमेंट्स...