Home | Sports | From The Field | dhonis-bat-to-be-auctioned

विश्वकरंडकात विजयी षटकार मारणाऱ्या धोनीच्या बॅटचा लिलाव

वृत्तसंस्था | Update - Jul 17, 2011, 09:20 PM IST

भारतीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी याने विश्वकरंडकात विजयी षटकार मारुन संघाला विजय मिळवून दिलेल्या बॅटचा सोमवारी लिलाव होणार आहे.

  • dhonis-bat-to-be-auctioned

    मुंबई - भारतीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी याने विश्वकरंडकात विजयी षटकार मारुन संघाला विजय मिळवून दिलेल्या बॅटचा सोमवारी लिलाव होणार आहे. धोनीने विश्वकरंडक स्पर्धेत श्रीलंकेविरुद्ध झालेल्या अंतिम सामन्यात याच बॅटने ९१ धावांची खेळी केली होती.

    लंडनमधील हिल्टन पार्क लेन येथे होणाऱ्या लिलावात ही बॅट ठेवण्यात येणार आहे. लिलावात अंतिम सामन्यासाठी वापरण्यात आलेला चेंडूही ठेवण्यात येणार असून, या चेंडूवर मुथय्या मुरलीधरनचे हस्ताक्षर असणार आहे. तसेच साचा जाफरी यांनी बनविलेले सचिन तेंडुलकर आणि रिकी पाँटींगच्या पेंटीगचाही लिलाव होणार आहे. या लिलावातून मिळालेले पैसे धोनीची पत्नी साक्षी हिच्या फौंडेशनमध्ये जमा होणार आहे. या पैशांचा वापर शाळा बांधण्यासाठी होणार आहे. या शाळेमुळे अनेक मुलांना मोफत शिक्षण घेता येणार आहे.
    follow us on twitter @ Divyamarathiweb

Trending