आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dhoni's Golden Era Continue, Ad Guru Show Trust On Mahi

धोनीचा सुवर्णकाळ अजूनही कायम; अॅड गुरूंनी दाखवला माहीवर विश्वास, कमाई १२१ कोटी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - एकदा कारकीर्द घसरणीला लागली की मग कोणीच विचारत नाही. असे अनेक चित्रपट कलाकार आणि क्रिकेटर आपण पाहिले आहे. या अनुषंगाने विचार करता भारतीय क्रिकेट टीमचा सर्वात यशस्वी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केल्यानंतर त्याचीही बाजारातील पत खालावेल असे मानले जात होते. परंतु नामवंत अॅड गुरूंच्या मते धोनीची बाजारातील पत कमी न होता ती आणखी वाढेल. धोनीचा खरा सुवर्णकाळ आता सुरू होईल.

रांचीसारख्या शहरातून येऊन धोनीने भारतीय क्रिकेट संघाला शिखरावर नेऊन ठेवले. या यशाबरोबर धोनीने जाहिरात क्षेत्रातही आपला ठसा उमटवला. कोट्यवधींचे करार खिशात घातले. त्यामुळेच फोर्ब्जने त्याला श्रीमंत खेळाडूंच्या यादीत पाचवे स्थान दिले. गेल्या वर्षी धोनीची जाहिरातीमधून कमाई होती १२६ कोटी रुपये.
पुढे वाचा, धोनीच्या जाहिरातींचे जग