आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जालंधरमध्ये खास तयार होत आहे धोनीची लकी बॅट!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धर्मशाळा - टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी क्रिकेटच्या खेळपट्टीवर ज्या बॅटने चौकार व षटकार ठोकून गोलंदाजांच्या नाकिनऊ आणतो, ती लकी बॅट पंजाबच्या जालंधरमध्ये तयार होते. धोनीची ही खास बॅट बीएएस नावाची कंपनी तयार करते. यामुळे धोनीचे जालंधरशी जुने संबंध आहेत.

22 फेब्रुवारीपासून भारत व ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेला प्रारंभ होत आहे. या प्रतिष्ठेच्या मालिकेचे महत्त्व लक्षात घेता कर्णधार माहीने कंबर कसली आहे. इंग्लंडपाठोपाठ आता पाहुण्या ऑस्ट्रेलियालाही मालिकेत चीत करण्याचा चंग धोनीने बांधला आहे. या मालिकेसाठी त्याने आपली जोरदार तयारी सुरू केली आहे. यासाठी त्याने बीएएस कंपनीचे मालक सोमनाथ कोहलीला नव्या बॅटची ऑर्डरही दिली आहे. ही ऑर्डर मिळताच कोहली यांनी स्वत: धर्मशाळा येथे येऊन धोनीची प्रत्यक्ष भेट घेतली आहे आणि बॅटचे काही नमुनेही त्यांनी माहीला दाखवले.
धोनीने जालंधर येथील बॅटने करिअरला सुरुवात केली होती. त्याने 23 सप्टेंबर 2004 मध्ये बांगलादेशविरुद्ध पहिल्या वनडेत जालंधर येथे तयार झालेल्या बॅटचा वापर केला होता.
धोनीची खास पसंती
जालंधर येथे बीएएस कंपनीत तयार होत असलेल्या बॅटला धोनीची खास पसंती आहे. ब-याच वर्षांपासून तो आमच्याकडून बॅट घेऊन जातो. यासाठी तो ब-या च वेळा मार्गदर्शनही करतो. यानुसार आम्हीही त्याला बॅट तयार करून देतो,अशी माहिती सोमनाथ कोहली यांनी दिली.
विदेशातही बॅटला मागणी
भारतासह विदेशातील खेळाडूंची येथील बॅटला विशेष पसंती असते. दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे, बांगलादेश व न्यूझीलंड येथील खेळाडूदेखील येथील बॅट वापरतात.