आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Diamond League Meet : Blesing Aukagabeyar Became Champion

डायमंड लीग मीट : ब्लेसिंग ओकागबेयर ठरली विजेती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बर्मिंगहॅम - नायजेरियाची ब्लेसिंग ओकागबेयर डायमंड लीग मीट धावण्याच्या शर्यतीत चॅम्पियन ठरली. तिने महिला गटातील 200 मीटर धावण्याची शर्यत जिंकली. तिने 22.55 सेकंदात निश्चित अंतर पूर्ण करून सुवर्णपदकावर नाव कोरले. तिने लंडन ऑलिम्पिकमधील 100 मीटर चॅम्पियन शैली एन. फ्रेजरला दुस-या स्थानावर समाधान मानावे लागले. तिने मॉस्को येथे होणा-या वर्ल्ड चॅम्पियनशिपमधील 100 व 200 मीटर धावण्याच्या शर्यतीच्या तयारीला प्रारंभ केला. मात्र, तिला बर्मिंगहॅममध्ये अपयशाला सामोरे जावे लागले.


नेस्टा कार्टर चमकला
जमैकाचा नेस्टा कार्टर 100 मीटरच्या शर्यतीत चमकला. त्याने पुरुष गटातील ही शर्यत 9.99 सेकंदात जिंकली. जगातील वेगवान धावपटू युसेन बोल्ट आणि योहान ब्लॅकच्या अनुपस्थितीत त्याने डायमंड लीगमध्ये बाजी मारली. या शर्यतीत इंग्लंडचा जेस दसोलू 10.03 सेकंदासह दुस-या स्थानावर राहिला. 2003 चा वर्ल्ड चॅम्पियन किम कोलिंसने 10.06 सेकंदासह तिस-या स्थानावर धडक मारली. डबल ऑलिम्पिक चॅम्पियन मोहम्मद फराहने 5 हजार मीटर धावण्याच्या शर्यतीत अव्वलस्थान पटकावले.


कुलसन जेव्हियर अव्वलस्थानी
पुरुषांच्या 400 मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत कुलसन जेव्हियरने बाजी मारली. त्याने 48.59 सेकंदात शर्यत जिंकून सुवर्णपदक आपल्या नावे केले. यामध्ये इंग्लंडचा विल्यम रेयास दुस-या स्थानी राहिला. त्याने 48.93 सेकंदात निश्चित अंतर पूर्ण केले. तसेच अमेरिकेच्या टिन्सेली मायकलला (48.94 से.) तिस-या स्थानावर समाधान मानावे लागले.