आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाश्त्यावेळी पितो 3 लिटर दुध, शाकाहारी नरसिंगचा असा आहे डायट चार्ट, वाचा...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नरसिंग यादव... - Divya Marathi
नरसिंग यादव...
स्पोर्टस डेस्क- डोपिंग प्रकरणात क्लीन चिट मिळाल्यानंतर पैलवान नरसिंग यादव मुंबईतील कांदिवली येथील आखाड्यात सराव करीत आहे. आता त्याने कोणताही धोका पत्करायचा नाही म्हणून सोनीपत ऐवजी मुंबईतच सराव करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच तो पुढील आठवड्यात मुंबईतूनच थेट रिओला पोहचेल. तिकडे, मुलाला न्याय मिळाल्यानंतर नरसिंगच्या वडिलांनी दिल्लीतील उपोषण सोडून वाराणसी गाठली. तेथे जाताच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जनसंपर्क कार्यालयातील पदाधिका-यांना भेटून त्यांचे आभार मानले.
पंतप्रधान मोदी यांच्यामुळेच माझ्या मुलाला न्याय मिळाला अशी भावना व्यक्त करीत त्यांनी सर्वांच्या आभाराचे एक पत्र दिले. यावेळी नरसिंगचे वडिल पंचम यादव यांच्यासमवेत नरसिंगचे वाराणसीतील कोच कृष्‍ण कुमार व इतर खेळाडू उपस्थित होते. यावेळी कृष्‍ण कुमार यांनी आम्हाला नरसिंग सध्या घेत असलेल्या डायटबाबत विस्ताराने माहिती दिली. पूर्ण शाकाहारी आहे नरसिंग...
- नरसिंगच्या माजी कोच राहिलेल्या कृष्ण कुमार यांनी सांगितले की, नरसिंग पूर्णपणे शाकाहारी आहे.
- मूळचे वाराणसीचे असलेल्या कृष्ण कुमार यांनी नरसिंगला वाराणसी व सोनीपतमध्ये ट्रेनिंग दिले आहे.
पुढे स्लाईड्सद्वारे वाचा, नरसिंगचा सकाळचा नाश्ता, दुपारचे जेवण, सायंकाळचा अल्पोहार आणि रात्रीचे जेवण कसे असते...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...