नवी दिल्ली - भारतरत्न सचिन तेंडुलकरवर आधारित पुन्हा एक पुस्तक नव्याने बाजारात आले आहे. या पुस्तकात सचिनच्या शेवटच्या कसोटीशी संबंधी रोमांच आणि भावनांना शब्दबद्ध करण्यात आले आहे. लेखक पत्रकार दिलीप डिसुझा यांचे ‘फायनल टेस्ट : एक्झिट सचिन तेंडुलकर’ नावाचे पुस्तक बाजारात आले आहे. यात गतवर्षी नोव्हेंबरमध्ये वेस्ट इंडीजविरुद्ध झालेल्या सचिनच्या शेवटच्या कसोटीचे वर्णन करण्यात आले आहे. याशिवाय मैदानावरील आणि बाहेरील सचिनच्या कार्यावरही प्रकाशझोत टाकण्यात आला.
लेखकाने त्या अडीच दिवसांच्या क्षणाला व भारतीय क्रिकेटच्या चाहत्यांनी सचिनवरील प्रेमवर्षावाला शब्दबद्ध केले.सचिन हा पाय-या उतरून मैदानाकडे येत असताना चाहत्यांमधील उत्साह शब्दात सांगणे कठीण होत, असे ते म्हणाले.