आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dilip Vengasarkar News In Marathi, BCCI, Divya Marathi

भारतीय फलंदाज म्हणजे बळीचे बकरे - वेंगसरकर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - कसोटी क्रिकेटबाबत बीसीसीआयची अनास्था, दूरदृष्टी नसलेली निवड समिती, धोनीचे अनाकलनीय नेतृत्व, अवास्तव सपोर्ट स्टाफ, सामन्यात 20 बळी घेण्याची क्षमता नसलेली गोलंदाजी आणि बळी द्यायला नेत असलेल्या बक-यासारखे वाटावेत असे तंत्रहीन, कचखाऊ, जिद्दीचा अभाव असणारे फलंदाज यामुळे इंग्लंडमध्ये भारतीय संघाचे वस्त्रहरण झाले, अशी प्रतिक्रिया भारताचे माजी कप्तान व राष्ट्रीय निवड समितीचे माजी अध्यक्ष दिलीप वेंगसरकर यांनी ‘दिव्य मराठी’कडे व्यक्त केली.
मुंबईच्या विविध दहीहंडी उत्सवांना भेट देत विलेपार्ले येथे आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना वेंगसरकर म्हणाले, ‘भारतीय क्रिकेट संघाची हंडी तर कालच फुटली आहे.’
युवा पिढीच्या गुणवत्तेला आकार देण्यासाठी 19 वर्षांखालील व 23 वर्षांखालील संघांचे दौरे आयोजित करणे गरजेचे होते. राष्ट्रीय क्रिकेट अकॅडमीने कसोटी क्रिकेटसाठी गुणवत्तावान खेळाडू पुरवण्याचे काम करावे, असेही आवाहन त्यांनी या वेळी केले.