आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dimand Of Vidarbha Tennis Coach Latest News In Marathi

विदर्भातील टेनिस प्रशिक्षकांना मागणी, टेनिसचे नियम केले मराठीत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - उमेश गेडाम! चंद्रपूरमधल्या एका छोट्याशा गावातला एक बेरोजगार तरुण. अचानक या उमेशला पुणे, नागपूर, हैदराबाद या शहरांतून टेनिस प्रशिक्षकपदासाठी विचारणा व्हायला लागली. अन्य शहरांमधूनही उमेशसारख्या चंद्रपूर, वर्धा, गोंदिया, भंडारा, रामटेक, नागपूर, गडचिरोली येथील अशाच बेरोजगार युवकांना नोकर्‍यांच्या ऑफर्स यायला लागल्या आहेत. हा चमत्कार वर्षभरात घडला. याचे कारण.. महाराष्ट्र लॉन टेनिस असोसिएशनचा ‘ग्रामीण कौशल्य विकास’ कार्यक्रम. या कार्यक्रमाअंतर्गत नक्षलप्रभावित 7 जिल्ह्यांतील 22 युवकांनी टेनिस प्रशिक्षकाचा कार्यक्रम उत्तीर्ण केला. प्राथमिक टेनिस प्रशिक्षकपदाचे प्रशस्तिपत्रक हाती पडताक्षणीच या 22 युवकांना विविध ठिकाणांहून नोकर्‍यांसाठी आमंत्रणे आली आहेत. महाराष्ट्र टेनिस संघटनेचे कोशाध्यक्ष सुंदर अय्यर ‘दिव्य मराठी’शी बोलत होते.

सुंदर अय्यर म्हणत होते, ‘ज्या खेडेगावातून गेडाम व त्याचे सहकारी आले आहेत, त्यांनी वर्षापूर्वी टेनिस बॉल, रॅकेट किंवा टेनिस खेळताना घालावयाचे बूटही पाहिले नव्हते. त्या भागातील हे युवक शहरी भागातील कोणत्याही उत्तम खेळाडूंशी दोन हात करू शकतात. सर्व्ह, व्हॉलीज आणि अटीतटीचे सामने खेळू शकतात.

‘ग्रामीण कौशल्य विकास’ या राज्य टेनिस संघटनेच्या योजनेचे शिल्पकार आहेत, स्वत: सुंदर अय्यर, आयटीएफ लेव्हल थ्री प्रशिक्षक हेमंत बेंद्रे, राज्यांचे प्रमुख टेनिस प्रशिक्षक मनोज वैद्य, प्रशांत सुतार आणि नागपूरच्या अतिरिक्त ग्रामीण आयुक्त डॉ. पल्लवी दराडे.’असेही या वेळी ते म्हणाले.
प्रशिक्षकांना पुणे, नाशिक, हैदराबाद येथील स्पोर्ट््स क्लबनी नोकर्‍या देऊ केल्या आहेत. 22 टेनिस प्रशिक्षकांची पहिली फळी यंदा तयार झाली आहे. नोकर्‍या तत्काळ मिळताहेत, हे स्पष्ट झाल्यामुळे यंदा योजनेला प्रतिसाद वाढला आहे.

टेनिसचे नियम केले मराठीत
गडचिरोलीसह विदर्भ विभागाचे टेनिस प्रशिक्षक अर्जुन सुतार, कपिल चुतेले यांनी दरदिवशी 8-8 तास राबून या युवकांना प्रशिक्षण दिले आणि टेनिस प्रशिक्षकाच्या योग्यतेपर्यंत पोहोचवले. इंग्रजीतील प्रशिक्षण कार्यक्रम मराठीत भाषांतरित केला. टेनिसचे नियमदेखील मराठीत भाषांतरित केले आणि या युवकांना टेनिसमध्ये परिपूर्ण केले. डॉ. पल्लवी दराडे यांनीही नियमांच्या चौकटीबाहेर, चाकोरीबाहेर जाऊन या योजनेला साहाय्य केले.