आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डायमंड लीग : मेनकोव्ह, बेकेलेला सुवर्णपदक

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - रशियाचा अलेक्झांडर मेनकोव्ह आणि इथिओपियाच्या केनेनिसा बेकेलेने डायमंड लीगमध्ये सुवर्णपदक पटकावले. स्पर्धेच्या 10 हजार किमी धावण्याच्या शर्यतीत जागतिक विक्रम नोंदवणा-या बेकेलेने अव्वल स्थान गाठले. त्याने 27:12.08 सेकंदात ही स्पर्धा पूर्ण केली. या शर्यतीत इथिओपियाच्या धावपटूंनी तिन्ही पदकावर नाव कोरले. इमाने मेग्राने दुसरे व अबेरा कुमाने तिसरे स्थान पटकावले.


रशियाच्या मेनकोव्हने 8.39 मीटर लांब उडी मारून सुवर्णपदक जिंकले. यामध्ये ब्राझीलचा माउरो विनिसियस सिल्वा (8.22 मी.) दुस-या स्थानी राहिला. तसेच महिलांच्या गोळाफेकमध्ये न्यूझीलंडच्या वालेरीई अ‍ॅडम्सने बाजी मारली. तिने 20.15 मीटर गोळाफेक करून सुवर्णपदक आपल्या नावे केले. चीनच्या गोंग लिजिओला (20.15 मी.) दुस-या स्थानावर समाधान मानावे लागले. तसेच अमेरिकेची एम. कार्टर (19.65 मी.) तिस-या स्थानावर राहिली. या वेळी गोंगने सुवर्णपदकासाठी जोरदार प्रयत्न केला. मात्र, तिला दुस-या स्थानावर समाधान मानावे लागले.


किमर्बेली दुस-या स्थानावर
जर्मनीच्या ख्रिस्टियाना ओबेर्गफोईलने महिला गटातील भालाफेकमध्ये सुवर्णपदक जिंकले. तिने 67.70 मीटर भालाफेक केला. या गटात ऑस्ट्रेलियाच्या किमर्बेलीने (63.80 मी.) दुसरे स्थान पटकावले.