राष्ट्रकुल स्पर्धेत स्क्वॅशमध्ये महिलांच्या दुहेरीत भारतीय खेळाडू दीपिका पल्लिकल आणि जोश्ना चिनप्पा यांनी सुवर्णपदक जिंकले. स्क्वॅशमधे भारताला प्रथमच सुवर्णपदक मिळाले आहे. या दोघींनी फायनलमध्ये इंग्लंडची जोडी जेनी डुनकाल्फ आणि लॉरा मसारो यांना दोन सेटमध्ये 11-6, 11-8 ने पराभूत केले. खूप कमी लोक जाणतात की, दिपिकाचे लग्न क्रिकेटपटू दिनेश कार्तिकसोबत झाले आहे. दीपिकाच्या या विजयामध्ये तिचा पती क्रिकेटपटू लकी चार्म ठरला आहे.
सध्या भारतीय संघात परतण्यासाठी प्रयत्न करणारा दिनेश कार्तिक मात्र पत्नीसाठी लकी ठरला आहे. दीपिकासाठी भाग्यशाली ठरला आहे.
दीपिकाला चिअर अप करण्यासाठी ग्लासगोला पोहोचला होता. सुवर्ण पदक जिंकल्यानंतर दीपिकाने पती दिनेश कार्तिक सोबत सेल्फी फोटोही तिने घेतला होता.
पुढील स्लाइडवर पाहा, अशा महिला खेळाडू की, ज्यांचे पती ठरले लकी चार्म..