आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dinesh Kartik And Dipika Pallikal At Platinum Event

कार्तिक आणि दीपिका लवकरच वि‍वाहबंधनात अडकणार , एकमेकांना दिला लव्‍ह बँड

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नई दिल्ली - आयपीएल मधील दुसरा सर्वांत महागडा क्रिकेटपटू दिनेश कार्तिक आणि इंचियोन आशियाई खेळांत पदक विजेती दीपिका पल्लीकल यांनी पुढील वर्षी लग्‍न करण्‍याचा निर्णय घेतला आहे. गेल्‍या वर्षी नोव्‍हेंबरमध्‍ये त्‍यांचा साखरपुडा झाला आहे.
बुधवारी एका कार्यक्रमामध्‍ये माध्‍यमांसमोर कार्तिक आणि स्क्वॅशपटू दीपिकाने एकमेकांच्‍या हातात प्लेटिनम लव्‍ह बँड घातला. त्‍यांनी म्‍हटले की, जेव्‍हा केव्‍हा आम्‍हाला वेळ मिळतो तेव्‍हा आम्‍ही एकमेकांना भेटायला जातो. त्‍यामुळे आम्‍हाला नवी प्रेरणा मिळत असते. कार्तिकने म्‍हटले की, आशियाई खेळांमध्‍ये दीपिकाला प्रोत्‍साहन देण्‍यासाठी मी उपस्थित राहू शकलो नाही तरी दिल्‍ली ये‍थिल स्‍पर्धांना मी आवर्जून उपस्थित होतो.
संघात पुनरागमनासाठी उत्‍सुक : कार्तिक
दीपिका आयपीएल चे सामने बघायला आल्‍याने मला प्रेरणा मिळते. गेल्‍या आयपीएलमध्‍ये माझी कामगिरी लौकिकाला साजेशी झाली नसली तरी मी सध्‍या कसून सराव करत असून भारतीय संघात पुनरागमनासाठी मी आतूर झालो आहे. असे दिनेश कार्तिकने सांगितले.
पुढील स्‍लाइडवर पाहा, दी‍पिका आणि कार्तिकचे निवडक छायाचित्रे...