आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आयबीएल उद्घाटन सोहळ्यात दीपिकाचे ठुमके !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चंदिगड - रुपेरी पडद्यावर धमाल उडवून देणारे बॉलीवूडचे स्टार नेहमीच स्पर्धेच्या आयोजनात रंग चढवतात. इंडियन बॅडमिंटन लीगच्या उद्घाटन सोहळ्यादरम्यान बॉलीवूड तारका दीपिका पदुकोनच्या ठुमक्यांवर चाहत्यांना ताल धरण्याची संधी मिळू शकते. येत्या 14 ऑगस्टला आयबीएलचा उद्घाटन सोहळा होणार आहे. हा सोहळा अविस्मरणीय करण्यासाठी प्रियंका चोप्रा व दीपिका पदुकोन एकत्रित परफॉर्मन्स करणार असल्याची चर्चा आहे.

आयबीएलचा उद्घाटन सोहळा दिल्लीतील सिरिफोर्ट स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये संध्याकाळी 6:30 ते 7:30 वाजेदरम्यान होणार आहे. यामध्ये आयबीएलच्या सर्व फ्रँचायझी आणि सहा संघांतील खेळाडू सहभागी होतील. त्यानंतर रात्री आठ वाजता उद्घाटनीय सामन्याला प्रारंभ होईल.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आयबीएलच्या कर्मशियल पार्टनर स्पोर्टी सोल्युशन्स बॉलीवूडच्या अनेक मोठय़ा कलाकारांच्या संपर्कात आहेत.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या आयपीएलच्या धर्तीवर या लीगच्या उद्घाटन सोहळ्याचे आयोजन केले जाणार आहे. या सोहळ्यात सहा शहरांतील (दिल्ली, मुंबई, लखनऊ, बंगळुरू, पुणे आणि हैदराबाद) संघ सहभागी होतील. मुंबई फ्रँचायझीचे मालक सुनील गावसकर यांची उपस्थिती ही सोहळ्याचे खास आकर्षण असेल.


300 रुपयांचे स्वस्त तिकीट
आयबीएलकडे चाहत्यांची गर्दी खेचण्यासाठी आयोजकांनी 300 रुपयांचे स्वस्त तिकीट ठेवले आहे. या ठिकाणी तीन गटांत तिकिटांची विक्री केली जाईल. सिरिफोर्टमध्ये 300व्यतिरिक्त 500 आणि एक हजारांचेही तिकीट आहे. या तिकिटांची विक्री ऑनलाइन सुरू आहे.

डग आऊटही असणार
आयपीएलप्रमाणेच या लीगमध्ये मैदानाच्या बाहेर डग आऊटमध्ये बसून फ्रँचायझी मालकांना सामन्यांचा आनंद लुटता येईल. या ठिकाणी फ्रँचायझी, स्पॉन्सर, खेळाडू आणि स्पोर्ट स्टाफ कर्मचार्‍यांच्या बसण्याची व्यवस्था केली आहे. आयपीएलसारखेच सर्वांचे अँक्रिडेशन कार्डही तयार करण्यात आले आहे. प्रत्येक स्टेडियममध्ये डग आऊट तयार केले आहे. डग आऊटमध्ये बसण्यासाठी वेगळे कार्ड तयार केले आहे.