आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dipika Pallikal Packs Off Perry To Enter Texas Open Final News In Divya Marathi

टेक्सास ओपन स्क्वॅश : दीपिका पल्लिकल फायनलमध्ये

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

होऊस्टोन - भारताची आघाडीची खेळाडू दीपिका पल्लिकलने विजयी मोहीम अबाधित ठेवताना टेक्सास ओपन स्क्वॅश चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत धडक मारली. तिने उपांत्य लढतीत बलाढ्य आठव्या मानांकित माडेलीन पेरीचा पराभव केला.

जागतिक क्रमवारीत 12 व्या स्थानी असलेल्या दीपिकाने 11-7, 11-13, 13-11, 10-12, 11-4 अशा फरकाने उपांत्य सामना जिंकला. यासाठी तिला तब्बल 75 मिनिटे झुंज द्यावी लागली. या विजयासह तिने फायनलमधील प्रवेश केला. तिची करिअरमधील ही सर्वोत्कृष्ट कामगिरी ठरली. पेरीने दमदार पुनरागमन करताना दुसर्‍या गेममध्ये बाजी मारली. मात्र, तिला तिसर्‍या गेममध्ये पुन्हा अपयशाला सामोरे जावे लागले. तिसरा गेम दीपिकाने जिंकला. त्यानंतर चौथ्या गेममध्ये आठव्या मानांकित पेरीने बाजी मारून लढतीत 2-2 ने बरोबरी साधली. दरम्यान, पाचव्या निर्णायक गेममध्ये दीपिकाने बाजी मारून अंतिम फेरी गाठली.

दीपिकासमोर नूरचे आव्हान
आता दीपिकासमोर अंतिम सामन्यात इजिप्तच्या नूर एल शेर्बिनीचे तगडे आव्हान असेल. किताबासाठी या दोन्ही तुल्यबळ खेळाडंूमध्ये फायनल रंगणार आहे. नूरने उपांत्य लढतीत फ्रान्सच्या कॅमिले सेरमला 11-5, 11-9, 9-11, 11-6 अशा फरकाने पराभूत केले. यासह तिने 55 मिनिटांत अंतिम फेरीत प्रवेश केला.