आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Divij Sharan Advances To China International Second Round

चीन अांतरराष्ट्रीय टेनिस: दिविज शरण दुसऱ्या फेरीत; प्रशांतचा अनपेक्षित पराभव

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अन्निंग - भारताचा स्टार युवा खेळाडू दिविज शरणने मंगळवारी चीन अाेपन अांतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत शानदार विजयी सलामी दिली. त्याने अाक्रमक सर्व्हिसच्या बळावर अापला दुसऱ्या फेरीतील प्रवेश निश्चित केला. यासाठी त्याला तब्बल दाेन तास एक मिनिट शर्थीची झुंज द्यावी लागली. दुसरीकडे विजय सुंदर प्रशांतला पाचव्या मानांकित त्सुंग हुअा यांगने ६-७, ६-२, ६-४ ने पराभूत केले.

दिविजने पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीत यजमान संघाच्या वेई क्विंग झेंगचा पराभव केला. त्याने सरळ तीन सेटपर्यंत रंगलेल्या लढतीमध्ये ३-६, ७-५, ७-६ अशा फरकाने विजय संपादन केला. यासह त्याने पुढची फेरी गाठली. दमदार सुरुवात करून विजयासाठी झंुज देणाऱ्या झेंगला घरच्या मैदानावर पराभवाला सामाेरे जावे लागले.

भारताच्या दिविजची निराशाजनक सुरुवात झाली. यावेळी केलेल्या सुमार खेळीचा फायदा घेत झेंगने अापल्या सेटमध्ये बाजी मारली. त्याने यासह लढतीत अाघाडी मिळवली. त्याने या सेटमध्ये सहज वियज संपादन केला.

मात्र, भारताच्या दिविजने अाक्रमक सर्व्हिस करताना दुसऱ्या सेटमध्ये दमदार पुनरागमन केले. या वेळी झेंगच्या शानदार खेळीने ट्रायब्रेकरपर्यंत रंगलेल्या दाेन्ही सेटमध्ये बाजी मारून भारताच्या खेळाडूने सामना जिंकला अाणि स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश केला.
दिविज-यान समाेरासमाेर
अाता भारताच्या दिविजसमाेर दुसऱ्या फेरीत चीनच्या यान बाईचे अाव्हान असेल. चीनच्या या खेळाडूने अापल्या पहिल्या फेरीतील सामन्यात घरच्या मैदानावर एकतर्फी विजय संपादन केला. त्याने अापल्या सलामी सामन्यात दुसऱ्या मानांकित लुके साव्हिल्लेचा पराभव केला. त्याने ६-४, ७-६ ने विजय संपादन केला. यासह अाॅस्ट्रेलियाच्या खेळाडूला स्पर्धेतून बाहेर पडावे लागले.
कारुनुड्डीचा राेमहर्षक विजय
भारताच्या कारुनुड्डीनेहीदेखील पुरुष एकेरीच्या सलामी सामन्यात राेमहर्षक विजयाची नाेंद केली. त्याने पहिल्या फेरीत अाठव्या मानांकित डेव्हिड परेझ सांझवर मात केली. भारताच्या खेळाडूने ६-७, ६-४, ६-४ अशा फरकाने सामना जिंकला. यासाठी त्याने दाेन तास १७ मिनिटे झंुज दिली.