आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Divya Primer Legaue News In Marathi, Divya Marathi, Aurangabad

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आजपासून दिव्य प्रीमियर लीगला सुरूवात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - तनवाणी (नि:शुल्क शुद्ध पेयजल उपक्रम) दुस-या ‘दिव्य प्रीमियर लीग’ क्रिकेट स्पर्धेला शनिवार, 21 जून रोजी सुरुवात होत आहे. स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा क्रिकेट संघटनेच्या मैदानावर सकाळी 11 वाजता माजी आमदार किशनचंद तनवाणी आणि बंटी तनवाणी यांच्या उपस्थितीत क्रिकेटपटू अंकित बावणे याची आई कांता रामदास बावणे, महिला क्रिकेटपटू प्रियंका गारखेडे, कांचन फाजगे, श्वेता माने आणि पूजा तोडकर यांच्या हस्ते होईल.

स्पर्धेचा उद्घाटनीय सामना जितू मोटवाणी चॅलेंजर्सविरुद्ध अग्रवाल-ठक्कर एजे स्ट्रायकर्स यांच्यात दुपारी 12 वाजता सुरू होईल. उद्घाटनप्रसंगी सीटीए संघाचे प्रशांत धुमाळ, अतुल सावे इलेव्हन संघाचे अतुल सावे, विनोद पाटील टायगर्स संघाचे विनोद पाटील, अतिक मोतीवाला, सान्या इनक्रेडिबल्स संघाचे अजित मुळे, मिलिंद पाटील, मिहिर मुळे, गजानन ऑइल इंडियन्सचे नितीन जाधव आदींची
उपस्थिती राहील.