आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Djokovic Battles, Nadal Cruises Into US Open Final

अमेरिकन ओपन: जोकोविच आणि नदालमध्‍ये रंगणार अंतिम सामना

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्‍यूयॉर्क- अमेरिकन ओपनच्‍या दुस-या सेमीफायनलमध्‍ये जगातील नंबर एकचा खेळाडू नोव्‍हाका जोकोविचने दहाव्‍या क्रमांकावरील स्‍टेनिस्‍लास वावरिंकाचा पाच सेटपर्यंत चाललेल्‍या सामन्‍यात 2-6,7-5 (7/4), 3-6, 6-3, 6-4 ने पराभूत केले.

सोमवारी होणा-या अंतिम सामन्‍यात सर्बियाच्‍या जोकोविचचा सामना दुस-या क्रमांकाचा आणि 12वेळा ग्रँड स्‍लॅम विजेता राफेल नदालशी होणार आहे.

नदालने सेमीफायनलमध्‍ये नवव्‍या क्रमांकाचा फ्रान्‍सच्‍या रिचर्ड गॅसक्‍वेटला 6-4, 7-6 (7/1), 6-2ने पराभूत केले. नदाल 2010नंतर चौथ्‍यांदा अमेरिकन ओपनच्‍या अंतिम फेरीत पोहोचला आहे. 2012मध्‍ये गुडघ्‍याच्‍या दुखापतीमुळे तो या स्‍पर्धेत खेळू शकला नव्‍हता.