आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आतापासून करा 2024 ऑलिम्पिकची तयारी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एक अब्ज लोकसंख्या असलेल्या देशाला ऑलिम्पिक मध्ये केवळ सहा पदके. यामुळे अतिउत्साह होत नाही. मात्र, निराशाही होत नाही. मला वाटते की, भारतीय क्रीडाप्रेमींना एवढ्याच पदकांची आशा होती. तिरंदाज व नेमबाजांनी चांगले प्रदर्शन केले असते तर पदकांची संख्या वाढली असती. मात्र, किंतु-परंतुसारखे हे घडले आहे.
लंडन ऑलिम्पिक पासून जर आपण धडा घेतला तर भविष्यामध्ये चांगली कामगिरी करता येऊ शकते. यासाठी आपल्याला काही निवडक खेळांवर लक्ष केंद्रित करावे लागेल. याला आपण लंडन ऑलिम्पिक च्या उदाहरणाने समजावून घेऊ. कझाकस्तान (13 पदके, 4 सुवर्ण), इराण (13 पदके, 4 सुवर्ण), बेलारूस (12 पदके, 4 सुवर्ण), जमैका (12 पदके, 4 सुवर्ण) हे सर्व पदक तालिकेत आपल्यापेक्षा वरच्या स्थानावर आहेत. या देशांच्या कामगिरीकडे पाहता असे म्हटले जाईल की, आपल्याकडे गरिबी व सोयी-सुविधांची कमतरता आहे.
मात्र, केवळ निवडक खेळांवर लक्ष केंद्रित केल्यामुळे या देशांनी अधिकाधिक पदके जिंकली आहेत. कझाकने बॉक्सिंग, कुस्ती व इराणने कुस्ती, वेटलिफ्टिंगला निवडले. बेलारूसने नेमबाजी, तिरंदाजी, रोइंग, टेनिस व जमैकाने कमी अंतराच्या धावण्याच्या शर्यतीवर आपले लक्ष केंद्रित केले.
नेमबाजी, बॅडमिंटन, कुस्ती व बॉक्ंिसगमध्ये आपली बाजू बळकट आहे. मी या यादीतून हॉकीला बाहेर ठेवले आहे. या खेळामध्ये आपण आॅस्ट्रेलिया, जर्मनी, हॉलंडच्या तुलनेत फारच मागे आहोत. यामधून पदकाची अपेक्षा चुकीची आहे. दु:खद असले तरी वास्तव आहे. बॉक्सिंग व कुस्ती या दोन्ही खेळांमध्ये वेगवेगळे वजन गट असतात. त्यामुळे यातील खेळाडूंमध्ये फारसे अंतर नसते ही यामधील यशस्वी होण्याची आपली तांत्रिक बाजू आहे. लक्ष्य गाठण्याची योजना ही केवळ ताकदीच्या बळावर तयार करू नये. ज्या खेळांपासून पदकाची आशा नाही अशांवर जास्त पैसा व वेळ खर्च करू नये. युसेन बोल्ट व मायकल फेल्प्ससारखी प्रतिभा आपल्याकडे नाही , जी आतापर्यंत दिसली नाही. याचा अर्थ असा नाही की, इतर खेळांचा विकास होऊ नये. मात्र, यासाठी आपण व्यूहरचना तयार करायला हवी. यासाठी शाळेमध्ये एक तास खेळणे सक्तीचे करावे. दुसरे म्हणजे मुलींना आऊटडोर स्पर्धेत सहभागी होणे बंधनकारक करायला हवे. 2024 ऑलिम्पिक मध्ये 24 पदके जिंकण्याचा विचार करणे एवढेही कठीण नाही. मात्र, त्यासाठी आतापासून प्रारंभ करावा लागेल.