आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Doctors Abandon Attempts To Bring Michael Schumacher Out Of Coma

मायकल शुमाकर कोमातून बाहेर येणे आता अवघड; जर्मन मॅगझिन \'फोकस\'चा दावा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बर्लिन- फॉर्म्युला वन रेसर मायकल शुमाकर याच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. त्याच्या 14 वर्षीय मुलासोबत स्‍कीईंग करताना गंभीर जखमी झालेला शुमाकर अजूनही कोमात आहे. परंतु शुमाकर आता कोमातून बाहेर येणे अवघड असल्याचा दावा जर्मन मॅगझिन 'फोकस'ने केला आहे. शुमाकरला कोमातून बाहेर आणण्यासाठी डॉक्टरांनी शर्तीचे प्रयत्न केले. परंतु त्यांचे सगळे प्रयत्न निष्फळ ठरले आहेत.

'फोकस'नुसार फॉर्म्युला वनमध्ये सलग सात वेळा जागतिक चॅम्पियन ठरलेला मायकल शुमाकर मृत्यूशी झुंज देतो आहे. त्याची प्रकृती सुधारण्‍याची कोणतीही चिन्हे दिसत नसल्याने डॉक्टर हतबल आहेत.

फॉर्म्युला वन विजेता शुमाकर त्याच्या 14 वर्षीय मुलासोबत स्‍कीईंग करताना जमिनीवर कोसळला होता. शुमाकरच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. फ्रेंच आल्प्स येथील मेरिबल रिसॉर्टमध्ये 29 डिसेंबरला ही घटना घडली होती. दुर्घटनेनंतर शुमाकरला ग्रेनोबल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्‍यात आले होते.|

दरम्यान, शुमाकरच्या प्रकृतीत सुधारणा होत असून तो लवकरच कोमातून बाहेर येईल, असे त्याच्यावर उपचार करणार्‍या डॉक्टरांनी सांगितले होते. परंतु, 'फोकस'नुसार शुमाकरचे कोमातून बाहेर येणे आता दिवसेंदिवस अवघड होत आहे. शुमाकरची प्रकृती कोणत्या कारणामुळे गंभीर झाली, याबाबत मात्र डॉक्टरांनी अद्याप सांगितलेले नाही.

पुढे वाचा, स्‍कीईंग करताना जमिनीवर कोसळला होता शुमाकर...