आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘त्या’ महिला मुष्टियोद्ध्यांसाठी स्पर्धेचे दार बंद !, आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग महासंघाचा फतवा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - जेजू (कोरिया) येथे येत्या १३ ते २५ नोव्हेंबर या कालावधीत आयोजित करण्यात येणा-या महिलांच्या विश्व अजिंक्यपद बॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी विश्व बॉक्सिंग महासंघाने (आयबा) प्रत्येक महिला खेळाडूसाठी ‘गर्भधारणा झाली नसल्याचे’ अधिकृत डॉक्टरांनी दिलेले प्रमाणपत्र सक्तीचे केलेे आहे. त्यानुसार जेजू येथील स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणा-या १० महिला स्पर्धकांनी संघांच्या प्रशिक्षकांमार्फत ‘साई’ला विनंती करून डॉक्टरांचे हे प्रमाणपत्र देण्याबाबत विनंती केली होती.
‘आयबा’ संघटनेच्या आदेशानुसार जेजू येथील स्पर्धेसाठी जाणा-या महिला स्पर्धकांनी स्वत:हून ‘साई’ला पत्र लिहून तशी चाचणी तत्काळ करावी, अशी विनंती केली होती.

सर्जूबाला (४८ किलो), पिंकी राणी (५१ किलो) मीनाकुमारी (५४ किलो), पी. बसुमती (५७ किलो), प्रियंका चौधरी (६० किलो), पवित्रा (६४ किलो), तीतू (६९ किलो), मोनिका शानू (७५ किलो), स्वीटी (८१ किलो), कविता चहाल (८१ किलोवर) या महिला स्पर्धकांनी स्वत:च्या सह्यांनिशी बॉक्सिंग इंडिया व साईला विनंती करणारे पत्र दिले होते.

जेजू येथील स्पर्धेसाठी महिला स्पर्धकांसाठी सहभागाकरिता १९ हे किमान वय निश्चित करण्यात आले आहे. त्यामुळे किशोरवयीन स्पर्धकांसाठी गर्भधारणा चिकित्सा सक्तीची करण्यात आल्याची आवई उठवण्यात आली होती. ती चुकीची असल्याचे बॉक्सिंग इंडियाचे सरचिटणीस जय कवळी यांनी सांगितले. आज भारतीय स्पर्धकांसमवेत जेजू येथील स्पर्धेसाठी रवाना होताना जय कवळी यांनी ‘दिव्य मराठी’ला सांगितले, बॉक्सिंग इंडियाने नेहमीच भारतीय खेळाडूंचे हित जपण्याचा प्रयत्न केला आहे. आयबाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसारच बॉक्सिंग इंडिया काम करीत आहे. कारण विश्व संघटनेच्या आदेशांचे पालन न केल्यास खेळाडूंना अपात्र ठरवण्याचा धोका निर्माण होऊ शकतो.
जगभरासाठी हा नियम
सरितादेवी प्रकरणापासून आम्ही बोध घेतला आहे. ‘आयबा’चे नियम हे फक्त भारतीय स्पर्धकांसाठी नसून संपूर्ण जगभरातील खेळाडूंसाठीही सक्तीचे आहेत, हेही आपण लक्षात घेऊन कृती करायला हवी, असेही जय कवळी यांनी सांगितले.