आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गांगुलीच्‍या डोनाने घेतला दुर्गा अवतार, पाहा फोटो...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशभरात सगळीकडे नवरात्रीची धूम सुरू आहे. हवन-पूजन आणि मंत्रोच्‍चाराबरोबर गरबा नृत्‍याच्‍या माध्‍यमातून दुर्गादेवीची आराधना केली जात आहे. दुर्गादेवीची उपासना संपूर्ण भारतात जरी केली जात असली तरी बंगालमध्‍ये या उत्‍सवाला वेगळेच महत्‍व असते.

बंगाली लोकांमध्‍ये दुर्गा पूजा सुरूवातीपासूनच धार्मिक पर्वापेक्षा एक सांस्‍कृतिक उत्‍सव राहिला आहे. दुर्गा पूजेबरोबर बंगालची कला, समाज आणि संस्‍कृती जोडली गेलेली आहे.

टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीची पत्‍नी डोनाही बंगाल संस्‍कृतीमध्‍ये वाढलेली आहे. बंगाली आणि ओडिसी नृत्‍यात पारंगत असलेली डोना देश विदेशांत आपल्‍या नृत्‍य कौशल्‍याने कलाप्रेमींना मंत्रमुग्‍ध करत आली आहे. शुक्रवारी डोनाने आपल्‍या दीक्षा ट्रूपबरोबर मुंबईमध्‍ये एका कार्यक्रमात दुर्गादेवीवर आधारित एक नृत्‍य नाटीका सादर केली.

पुढच्‍या स्‍लाईडला क्लिक करून पाहा नृत्‍य नाटीकेतील डोनाचा दुर्गा अवतार...