आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माझ्या प्रतिमेचे दडपण अर्जुनवर येऊ देऊ नका - सचिन तेंडुलकर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - माझ्या प्रतिमेचे ओझे माझ्या मुलाकडे-अर्जुनकडे पाहताना, त्याच्याकडून अपेक्षा करताना ठेवू नका. 14 वर्षीय अर्जुनला स्वत:हून स्वत:चे करिअर घडवण्याची संधी द्या. एक पिता म्हणून माझी सर्व प्रसिद्धिमाध्यमांना विनंती आहे की, अर्जुन तेंडुलकर म्हणून त्याला मोठे होऊ द्या, अशी कळकळीची विनंती सचिन तेंडुलकरने मुंबई क्रीडा पत्रकार संघटनेच्या क्रीडापटूंच्या सत्कार सोहळ्यात केली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारताचे माजी बॅडमिंटन ‘हीरो’ नंदू नाटेकर होते.

या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण असलेल्या सचिन तेंडुलकरचा त्याच्या शंभर शतकांच्या निमित्ताने गौरव करण्यात आला. त्या प्रसंगी उपस्थित उद्योन्मुख खेळाडूंना उद्देशून बोलताना सचिनने सांगितले, ‘खेळाडू म्हणून यशस्वी होण्यासाठी स्वत:ला शिस्त लावून घ्या.’

या प्रसंगी तन्वी लाड (बॅडमिंटन), महेश माणगावकर (स्क्वॉश), पूनम राऊत (महिला क्रिकेट), अभिषेक नायर (क्रिकेट), अजित आगरकर (मुंबई रणजी विजेत्या संघाचा कप्तान), दीपिका जोसेफ (कबड्डी) व आदित्य मेहता (विश्व स्नूकर चॅम्पियन) यांचा सत्कार सोहळ्यात स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.


क्रीडा पत्रकारांवर सचिनची स्तुतिसुमने
* कारकीर्दीत अनेक आव्हाने येत असतात. त्या आव्हानांचा सामना करण्यासाठी नेहमीच सिद्ध राहा.
* खेळात सवरेत्तम होण्यासाठी कोणताही शॉर्टकट नाही, हे कायम लक्षात ठेवा.
* नेहमी स्वत:मध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण करा.
* नेहमी सवरेत्तम गोष्टींचाच ध्यास ठेवा.
* क्रीडा पत्रकार म्हणजे एखाद्या चित्रकारासारखे आहेत. प्रत्येक जण एकच सामना, क्षण आपापल्या परीने वेगवेगळ्या शैलीत रंगवत असतो.
* 1986-87 च्या सुमारास क्रीडा संघटनेने माझा सत्कार केला होता. मात्र, माझ्या कामगिरीची दखल घेण्यासाठी त्यांना एवढा अवधी लागला, याचे आश्चर्य वाटले.