आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Dont No When Sachin Get Retirement Sunil Gavaskar

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'सचिनच्या निवृत्तीचे भाकीत कठीण'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- गत 2006-2007 च्या क्रिकेट हंगामापासून सचिन तेंडुलकरच्या निवृत्तीबाबत बोलले जात होते, परंतु आजही तो त्याच पद्धतीने, हिरीरीने, उत्साहाने आणि जोशात खेळत आहे. त्यामुळे नवी दिल्ली येथे सुरू असलेली ऑस्ट्रेलियाविरुद्ध चौथी क्रिकेट कसोटी सचिन तेंडुलकरची भारतीय भूमीवरील अखेरची कसोटी असेल, असे भाकीत मला करता येणार नाही, असे स्पष्ट मत भारताचे माजी कप्तान सुनील गावसकर यांनी व्यक्त केले.

सचिन कधी निवृत्त होणार, या प्रश्नाचे अचूक उत्तर केवळ तोच देऊ शकतो, असे गावसकर पुढे म्हणाले.
भारतीय क्रिकेट संघ आगामी वर्षात सुमारे 12 महिन्यांच्या कालावधीत परदेशातच खेळणार आहे. त्यामुळे फिरोझशहा कोटला मैदानावर सध्या सुरू असलेली कसोटी ही त्याची देशातील अखेरची कसोटी असेल, असा तर्क अनेकांनी काढला आहे. एका टेलिव्हिजन वाहिनीला मुलाखत देताना गावसकर यांनी सांगितले, कसोटीच्या पहिल्याच दिवशी प्रतिस्पध्र्यांचे आठ खेळाडू 231 धावांच्या मोबदल्यात गुंडाळणे ही निश्चितच चांगली कामगिरी आहे. भारताच्य खेळाडूने परिणामकारक ठसा उमटवला आहे.

धोनीची नाणेफेकीची तक्रार नसेल- ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत भारताचा कप्तान धोनीला नाणेफेकीचा कौल गमावल्याचे जराही दु:ख झाले नसेल, असे सांगून गावसकर पुढे म्हणाले, 'नाणेफेक गमावलेले या मालिकेतील याआधीचे तिन्ही कसोटी सामने भारताने जिंकले. त्यामुळे चौथ्या कसोटीतही नाणेफेक गमावल्याबद्दल धोनीची तक्रार निश्चितच नसेल.'