आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Doping Spot Washed Through Wining Gold Medal Priyanka Pawar

सुवर्ण जिंकून धुतले डोपिंगचे डाग, ४०० मीटर रिलेत सुवर्ण जिंकून परतली प्रियंका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मेरठ - एशियन गेम्समध्ये सुवर्णपदक जिंकून प्रियंका पवार मंगळवारी रात्री आपल्या घरी मेरठ येथे पोहोचली. परतल्यानंतर तिचा चेहरा आनंदाने चमकत होता.तिच्या चेह-यावर दुहेरी आनंद दिसत होता. सर्वप्रथम तर तिने ४०० मीटर रिले शर्यतीत सुवर्ण जिंकले. शिवाय या पदकामुळे तिने डोपिंगचा डागही धुऊन काढला. डोपिंगच्या विळख्यात सापडल्याने तीन वर्षांपूर्वी याच शहराने आपल्या खेळाडूवर शंका घेण्यास सुरुवात केली होती. आता पदक जिंकून प्रियंकाने तमाम टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिले.

दैनिक भास्कर डॉट कॉमशी बोलताना प्रियंका म्हणाली, "माझ्यावर २०११ मध्ये डोपिंगचा आरोप लागला होता. मी दोन वर्षे माझ्यावर लावण्यात आलेला डोपिंगचा आरोप दूर करण्यासाठी न्यायालयाची लढाई लढले आणि जिंकलेसुद्धा. मी आता हा खेळ सोडून देईन, अशी टीका माझ्यावर व्हायची. आता सुवर्णपदक जिंकूनच सर्वांची तोंडे बंद करायचे मी ठरवले होते. मी आता स्वत:ला सिद्ध केले आहे,' असे तिने नमूद केले.