आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Double Amputee Athlete Wackuka At Glasgow Commonwealth Games

दोन्‍ही पाय नसताना 2 मिनिटांत पूर्ण केली 100 मीटरची शर्यत!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो - 100 मीटरच्‍या शर्यतीसाठी तयार वाकुका)
ग्‍लासगो - केनियाचे विकलांग महिला जलतरणपटु एन वाकूका राष्‍ट्रकुल स्‍पर्धेमध्‍ये अ‍ॅथलेटची भूमिका पार पाडत आहे. तिच्‍या जिद्दीला दिग्‍गजांनीसुध्‍दा सलाम केला आहे. तर धडधाकट चाहत्‍यांनी आश्‍यर्याने तोंडात बोटे घातली.
वाकूकाला दोन्‍ही पाय नाहीत. ती एस-8 प्रकारच्‍या अ‍ॅथेलिट प्रकारात मोडते. वाकुकाने विकलांगांच्‍या 100 मीटर पोहण्‍याच्‍या स्‍पर्धेमध्‍ये सहभाग घेतला. भलेही ती पारितोषिक मिळवू शकली नसली तरी तिच्‍या धाडसाने कित्‍येक स्‍पर्धक तसेच चाहत्‍यांना नवी प्रेरणा मिळाली आहे.
काय आहे एस-8 ?
पॅरा-अ‍ॅथलीट्स या क्रिडाप्रकारात जे खेळाडू दोन्‍ही किंवा एका हाताने अपंग असतील त्‍यांना प्रवेश असतो. सोबतच जे खेळाडू पायाने अपंग असतील असे खेळाडू यामध्‍ये खेळू शकतात.
दोन मिनिटात शंभर मीटर अंतर पार
वाकूकाने 100 मीटर स्‍पर्धेत शेवटचे स्‍थान मिळविले असले तरी सर्व प्रेक्षक तिला चिअरअप करत होते. ऑस्‍ट्रेलियाच्‍या मॅडिसन इलियटने 1 मिनिट 5.32 सेकंदामध्‍ये हे अंतर पार केले. तर वाकुकाने हेच अंतर 2 मिनिटे 4.03 सेकंदात पूर्ण केले.
जेव्‍हा अन्‍य स्‍पर्धकांनी स्‍पर्धा पूर्ण केली. परंतु वाकूका पोहत होती अशा वेळी सर्व क्रीडाप्रेक्षकांनी उभे राहून वाकूकासाठी टाळ्या वाजविल्‍या.
पुढील स्‍लाइडवर पाहा, राष्‍ट्रकुल क्रीडा स्‍पर्धेतील पॅरा एथलीट्सचे छायाचित्रे..