आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dozens Medal In Archery At The International Level

जगभरात नाव कमविणाऱ्या आंतरराष्ट्रीय तिरंदाजाच्या घराची अशी आहे दुरावस्था

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रांची- आंतरराष्‍ट्रीय स्‍तरावर डझनाहून अधिक पदके मिळविलेल्‍या दीपिका कुमारीला अजुनही शासनाने घर दिलेले नाही. आजही तिच्‍या गावामध्‍ये मुलभूत सुविधा पोहोचल्‍या नाहीत. पाच महिन्‍यांपूर्वी राज्‍य सरकारने दीपिकाच्‍या राहत्‍या घरी पाणी, शौचालय आणि स्‍नानगृह उपलब्ध करून देण्याची घोषणा केली होती.

राज्‍य सरकारच्‍या जल आणि स्‍वच्‍छता विभागाने पाणी, शौचालय आणि स्‍नानगृहासाठी 4.62 लाख रुपयांची घोषणा केली होती. तसे प्रमाणपत्रही 27 नोव्‍हेंबर 2013 रोजी झालेल्‍या कार्यक्रमात दीपिकाच्‍या वडिलांना दिले होते. मात्र आजही पिण्‍याच्‍या पाण्‍याची व्‍यवस्‍थादेखिल झाली नाही.

दीपिकाला अजून सरकारद्वारे घरही मिळालेले नाही. त्‍यामुळेच नाराज असलेल्‍या दीपिकाने सरकारवर सुविधा न देण्‍याचा आरोप केला आहे.

संपूर्ण बातमी वाचण्‍यासाठी पुढील स्‍लाइडवर क्लिक करा...