आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऔरंगाबाद - डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातर्फे आयोजित पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ टेबल टेनिस स्पर्धेत महिला गटात जयपूर राष्ट्रीय विद्यापीठ आणि मुलींमध्ये मुंबई विद्यापीठाने अजिंक्यपद पटकावले. गटात यजमान डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मुलांचा संघ चौथ्या आणि मुलींचा संघ दुसर्या स्थानावर राहिला.
भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या (साई) मैदानावर झालेल्या खो-खो स्पर्धेत कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाने विजेतेपद पटकावले. मुंबई विद्यापीठ दुसर्या स्थानी राहिले. पुण्याला तिसर्या आणि जळगावच्या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.
विजेत्या खेळाडूंना खासदार चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते बक्षीस प्रदान करण्यात आले. याप्रसंगी कुलगुरू डॉ. विजय पांढरीपांडे, साईचे सहायक संचालक वीरेंद्र भंडारकर, कुलसचिव डॉ. धनराज माने, डॉ. भागवत कटारे, डॉ. दयानंद भक्त, कुलजितसिंग दरोगा, गोविंद शर्मा, डॉ. युसूफ पठाण, विनायक पांडे यांची उपस्थिती होती.
यजमान विद्यापीठाचे टेबल टेनिस संघ :
मुले : सुशांत उबाळे, प्रसाद बुरांडे, रिशी गुलाटी, इशान डबरी, रवी कचरे. प्रशिक्षक कुलजितसिंग दरोगा. मुली : नताशा कुलकर्णी, मिहिका मुळे, तरणजित कौर दरोगा, भाग्यश्री खोसे, कनक भारद्वाज, प्रशिक्षक सचिन पुरी.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.