आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dr.babasaheb Ambedkar University Sprots Festival News In Marathi

यंदाचा विद्यापीठ क्रीडा महोत्सव रंगणार औरंगाबादेत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- यंदाचा विद्यापीठ क्रीडा महोत्सव औरंगाबादमध्ये आयोजित करण्यात येणार आहे. औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील क्रीडा विभाग या महोत्सवाचे आयोजन करणार आहे. ही स्पर्धा 26 नोव्हेंबर ते 1 डिसेंबरदरम्यान विद्यापीठ परिसरातील मैदानावर होणार आहे. यंदाच्या या स्पर्धेत 20 विद्यापीठांचे तब्बल 40 संघ सहभागी होणार आहेत.

या स्पर्धांसाठी विद्यापीठ परिसरातील तीन मैदाने सुसज्ज झाली आहेत. अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेसाठी नव्याने दहा लेनचा मातीचा ट्रॅक तयार करण्यात आला. सातदिवसीय स्पर्धेचा समारोप 1 डिसेंबर रोजी होईल. या वेळी समारोपीय सोहळ्यात बक्षिसांचे वितरण होईल.

17 वर्षांनंतर दुसर्‍यांदा यजमानपद
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला 17 वर्षांनंतर दुसर्‍यांदा क्रीडा महोत्सवाचे यजमानपद लाभले आहे. यापूर्वी 1998 मध्ये तत्कालीन क्रीडा विभागप्रमुख दत्ताभाऊ पाथ्रीकर यांच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
कबड्डी, व्हॉलीबॉलसह पाच खेळ प्रकार
यंदाच्या महोत्सवात कबड्डी, अ‍ॅथलेटिक्स, खो-खो, व्हॉलीबॉल आणि बास्केटबॉलचा या पाच खेळ प्रकारांचा समावेश आहे. यातील प्रत्येक खेळ प्रकारात एकूण 24 (महिला व पुरुष) खेळाडूंचा सहभाग असेल. प्रत्येक विद्यापीठातील 120 खेळाडू पाच खेळ प्रकारात खेळतील.

शुक्रवारी घोषणा
मुंबईतील राज भवनामध्ये आयोजित बैठकीत शुक्रवारी क्रीडा महोत्सवाच्या आयोजनाची अधिकृत घोषणा होणार आहे.