आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dr. Babasaheb Ambedkar University Sports Festival

विद्यापीठ क्रीडा महोत्सव : तलवारबाजीचा समावेश करण्याची मागणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यात होणार्‍या आंतरविद्यापीठ क्रीडा महोत्सवात तलवारबाजी खेळाचा समावेश करावा, अशी मागणी आमदार सतीश चव्हाण यांनी कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे यांच्याकडे केली आहे. चव्हाण यांनी नुकतीच कुलगुरूंची भेट त्यांना निवेदन दिले.
क्रीडा महोत्सवामध्ये एका खेळाचा समावेश करण्याचा अधिकार आयोजकांना आहे. औरंगाबादचे खेळाडू गेल्या पाच वर्षांपासून पहिल्या तीन क्रमांकात असून आंतरविद्यापीठ स्तरावर एकूण 5 पदके विद्यापीठाने मिळवली आहेत. या स्पर्धेसाठी जिल्हा तलवारबाजी संघटना तांत्रिकदृष्ट्या सहकार्य करण्यास तयार असल्याचे आमदार चव्हाण यांनी निवेदनात म्हटले. याप्रसंगी कुलसचिव डॉ. धनराज माने, डॉ. शिवाजी मदन, डॉ. अप्पासाहेब हुंबे, प्राचार्य डॉ. वसंत सानप, नारायणराव बोराडे यांची उपस्थिती होती.