आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dravid Disappionted Over The Rajsthan Royals Team Defeating

द्रविडला राजस्थान रॉयल्स संघाच्या पराभवाची खंत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - राजस्थान रॉयल्स संघाने चॅम्पियन्स लीग टी-20 क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना जिंकून दिलेला निरोप अधिक सुखद ठरला असता, अशी प्रतिक्रिया कर्णधार राहुल द्रविडने दिली. रविवारी लीगच्या फायनलमध्ये मुंबई इंडियन्सने राजस्थानचा पराभव केला. शेवटच्या टी-20 सामन्यात पराभवाने मिळालेल्या निरोपाविषयी द्रविडने खंत व्यक्त केली.


या वेळी दिलेल्या मुलाखतीमध्ये द्रविड म्हणाला की, आयपीएलमध्ये खेळायचे, हा विचार आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर केला होता. टीम इंडियात असताना मी ज्या पद्धतीने सराव करायचो, तशी कोणत्याही प्रकारची विशेष तयारी मी आयपीएलसाठी केली नाही. मात्र, आयपीएलमध्ये असताना मला अनेक नवीन अनुभव आले. आता पूर्णपणे मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेऊन आनंदाने राहू शकेन. ‘चॅम्पियन्स लीगमध्ये संघ जिंकल्यानंतर मला अधिक आनंद झाला असता. आता राजस्थानकडे आनंदात राहण्यासाठी अनेक संधी आहेत, असेही द्रविड म्हणाला.