आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Dravid, Vishwanath In Kirmani's Greatest Ever Test Team

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विश्वनाथ, द्रविड, कुंबळे किरमाणींच्या संघात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बंगळुरू - राहुल द्रविड, अनिल कुंबळे आणि गुंडप्पा विश्वनाथसह कर्नाटकच्या 12 सवरेत्तम क्रिकेटपटूंना माजी यष्टिरक्षक सय्यद किरमाणी यांनी आपल्या सर्वकालीन सर्वाेत्तम कसोटी संघात निवडले आहे. एकेकाळी भारतीय गोलंदाजीची धुरा वाहणारे र्शीनाथ आणि व्यंकटेश प्रसाद या संघात असले तरी ते राखीव आहेत. कर्नाटक क्रिकेट असोसिएशनच्या (केएससीए) अमृतमहोत्सव समारंभात किरमाणी यांनी हा संघ जाहीर केला.

व्यंकटरामण सुब्रमण्यम या संघाचे कर्णधार आहेत. किरमाणींनी स्वत:ला यष्टिरक्षकाच्याच भूमिकेत निवडले आहे. सुब्रमण्यम यांच्या गाठीशी 88 सामन्यांचा मोठा अनुभव आहे. त्यांनी 160 झेलही घेतले आहेत. मधल्या फळीतले भरवशाचे फलंदाज असा सुब्रमण्यम यांचा लौकिक होता. एक लेगस्पिनर म्हणूनही त्यांनी ख्याती कमावली. 1965-1968 हा काळ त्यांनी गाजवला. सुब्रमण्यम यांनी 1966-67 मध्ये त्या वेळच्या मद्रासमध्ये विंडीजविरुद्ध 61 धावा ठोकल्या होत्या.

कसोटी संघ : व्यंकटरमण सुब्रमण्यम (कर्णधार), रॉजर बिन्नी, राहुल द्रविड, गुंडप्पा विश्वनाथ, ब्रिजेश पटेल, सय्यद किरमाणी (यष्टिरक्षक), सुनील जोशी, अनिल कुंबळे, ईएएस प्रसन्ना, भागवत चंद्रशेखर, जवागल र्शीनाथ, व्यंकटेश प्रसाद