आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवी दिल्ली- भारतीय क्रिकेट संघानेही भलेही इंग्लंडविरूद्धच्या वनडे मालिकेत सलग तीन सामने जिंकून मालिका खिशात घातली असेल पण सध्याची टीम इंडिया सामान्य दर्जाची आहे, असे मत इंग्लंडचे माजी क्रिकेटपटू जेफ बॉयकॉट यांनी व्यक्त केले आहे. भारतीय संघ नशीबवान आहे कारण त्यांच्याकडे धोनीसारखा उत्तम कर्णधार आहे म्हणूनच भारतीय संघाला त्याने विजयी लयीवर आणले आहे, असेही बॉयकॉट यांनी स्पष्ट केले.
बॉयकॉट म्हणाले, भारतीय संघ समतोल नाही. खास करून संघाची वेगवान गोलंदाजीचा स्तर खूपच खालचा आहे. फिरकी गोलंदाज भारताला दर्जेदार मिळत नाहीत. तर, काही चांगल्या खेळाडूंनी निवृत्ती घेतली आहे काही त्याच्या उंबरठ्यावर आहेत. राहुल द्रविड आणि व्ही. व्ही. एस लक्ष्मण आता गेले आहेत. सचिन तेंडुलकर सध्या जास्त धावा करत नसल्याचे चित्र आहे. अशा वेळी धोनीची काही चूक आहे काय?. बॉयकॉट म्हणतात, मी संघाच्या जय-पराजयाबाबत बोलत नाही. पण टीममधील खेळाडूंचा दर्जा कसा आहे, संघ किती समतोल आहे हे पाहणे मी महत्त्वाचे समजतो. भारतीय क्रिकेट संघ खरंच नशीबवान आहे कारण त्यांच्याकडे धोनीसारखा खेळाडू आहे. समतोल व दर्जेदार खेळाडू नसतानाही त्याने संघाला पराभवातून विजयी लय मिळवून देण्याचा प्रयत्न करीत आहे. यात तो यशस्वी ठरत ठरला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.